शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

"मराठीत म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय", निलेश राणेंनी पुन्हा डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 13:03 IST

काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे.

ठळक मुद्देकाय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहेड्र्ग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी बनली आहे आजच्या शिवसेनेची ओळख मराठीमध्ये म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय

मुंबई - शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंचे पुत्र आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. मराठीमध्ये म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय, अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले आहे.सध्या गाजत असलेल्या ड्रग्स प्रकरणात शिवसेनेच्या एका उपनेत्याचा मुलाची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या वृत्ताचा आधार घेत निलेश राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्र्ग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी आजच्या शिवसेनेची ओळख बनली आहे. मराठीमध्ये म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे शिवसेनेला सातत्यानी टीकेचे लक्ष्य करत आहेत. काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाने नाणार प्रकल्पबाधितांची १४०० एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तर या जमिनीच्या व्यवहारात ८० टक्के परप्रांतीयांना जमिनी दिल्या असल्याचाही दावाही निलेश राणेंनी केला होता.याबाबत निलेश राणेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते म्हणाले की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असे सांगितले जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले, २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला, असा दावा निलेश राणेंनी केला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्याश्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे  

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेpollutionप्रदूषण