आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:08 IST2021-06-14T18:50:28+5:302021-06-15T15:08:30+5:30
MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा?

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मराठी ठेकेदाराला धमकी दिल्याचा आरोप मनसैनिकांनी महाडच्या अधिकाऱ्यावर शाई फेक आंदोलन केले आहे. कार्यकारी अभियंता असलेल्या राकेश गावित यांच्या कॅबिनमध्ये घुसून मनसैनिकांनी ९ महिन्यांपूर्वी आम्हाला वर्क ऑर्डर आली तरी आम्हाला काम का नाही देत असा जाब विचारत गावित यांच्यावर शाई फेकली आहे. मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? असा सवाल विचारत तुम्हाला टक्केवारी हवी का असा जाब मनसैनिकांनी विचारत मराठी माणसाची गळचेपी करत असून आमचा अंत पाहताय असा जाब विचारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मराठी ठेकेदाराला फोन करून धमकावत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांच्या तोंडावर शाई फासण्याचं आंदोलन केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
काव्या इंटरप्रायजेस या कंपनीला वरळी मतदारसंघातील १ कोटी १९ लाखांच्या कामाचं कंत्राट मिळालं होतं. त्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० या कामाचे आदेश (Work order) काढण्यात आले. तसेच शिवडी मतदारसंघात २० लाख ७१ हजारांची कामे मिळाली. या कामाच्या सिमेंट चाचणीचा रिपोर्टही ९ नोव्हेंबर २०२० रोजी प्राप्त झाला. काव्या इंटरप्रायजेसने शासनाच्या नियमांप्रमाणे ई निविदा भरून कंत्राट मिळवलं होतं. परंतु टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम करू न देता शिवसेनेचे एजेंट काम रद्द करण्यासाठी धमकावण्याच फोन करत होते. माजी आमदारसुनील शिंदे यांच्या नावाने विनय शेट्ये नावाच्या इसमाकडून धमकी देण्यात येत होती. वारंवार पाठपुरावा करूनही म्हाडाचे अधिकारी दबावात येऊन आणि टक्केवारीसाठी काम करू दिले जात नव्हते. कंपनीने वारंवार पत्र व्यवहार करूनही म्हाडाकडून चालढकल करण्यात येत होती. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. या प्रकरणी माजी आमदार सुनील शिंदे यांना त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.