शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे; 'महाराष्ट्रद्रोहा'वरून फडणवीसांनी सुनावलं

By कुणाल गवाणकर | Published: November 25, 2020 5:42 PM

शिवसेनेकडून सातत्यानं होणाऱ्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार

पुणे: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) टाकलेल्या छाप्यांमुळे सध्या राज्यातलं राजकारण तापलं आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर लक्ष्य केलं आहे. याआधी शिवसेनेनं अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत, कंगना राणौत प्रकरणावरून भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हटलं होतं. हाच धागा पकडत शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, त्यामुळे शिवसेनेवरील टीका महाराष्ट्रद्रोह नव्हे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवारआम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये, असा टोला फडणवीस यांनी लगावला. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत. आम्हालाही राज्याच्या अस्मितेचं भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचाही समाचार घेतला. जयंत पाटील यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य केल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रावर खापर फोडता येणार नाही म्हणून आता जयंत पाटील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा उकरून काढत आहेत. आपण निवडणुकीत पराभूत होणार, याची जाणीव असल्यानं त्यांनी आतापासूनच अशा प्रकारचे आरोप सुरू केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

‘तक्रार करण्यापुरताी का होईना, विरोधकांची दखल घेतली याचा आनंद’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलं. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाpratap sarnaikप्रताप सरनाईक