शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Vaibhav Naik : शिवसेना आमदारानं मोफत पेट्रोलसाठी दिला नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, पण घडलं उलटंच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 10:15 IST

Shiv Sena MLA vaibhav naik gave Narayan Rane petrol pump address for free petrol : शिवसेनेनं भाजपला डिवचण्यासाठी अनेखी ऑफर जाहीर केली. थेट नारायण राणेंच्याच पेट्रोल पंपावर स्वस्त दरात पेट्रोल वाटप होणार होतं. पण घडलं उलटच

राज्यात शिवसेना आणि भाजपमधील द्वंद्व काही केल्या थांबताना दिसत नाहीय. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुंबईत भाजपनं शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर झालेल्या राड्याचं उदाहरण ताजं असतानाच शिवसेनेनं भाजपला डिवचण्यासाठी अनोखी ऑफर जाहीर केली. शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली होती. सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लीटर पेट्रोल आणि भाजपचं सदस्यत्व ओळखपत्र दाखवणाऱ्या प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत वाटपाचा कार्यक्रम वैभव नाईक यांनी जाहीर केला होता. तसं ट्विटच वैभव नाईक यांनी केलं. विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होतं. त्यामुळे भाजपला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता.  Shiv SenaMLA vaibhav naik gave Narayan Ranes petrol pump address for free petrol

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजपला डिवचण्याचं वैभव नाईक यांचं हे आंदोलन आता उलटताना दिसत आहे. कारण वैभव नाईक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलेल्या कुडाळ येथील भारत पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनानं पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचा या पेट्रोल पंपावरील नियोजित पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. मग आमदार वैभव नाईक यांनी दुसऱ्या पेट्रोल पंपावर स्वस्त दरात पेट्रोल वाटपाचा निर्धार केला. तर त्याही पेट्रोल पंप व्यवस्थापनानं आता पोलीस स्टेशन गाठलं आहे. पेट्रोल-डिझेल वाटपात आम्हाला कोणताही राजकीय अभिनिवेश ठेवायचा नाही अशी भूमिका पेट्रोल पंप मालकांनी घेतली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचं भाजपला डिवचण्यासाठीचं अनोखं आंदोलन आता त्यांच्यावर उलटताना दिसत आहे. 

काय म्हणाले होते वैभव नाईक?शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्टर ट्विट करुन शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली होती. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना कुडाळ येथील भारत पेट्रोल पंपावर १०० रुपयांत दोन लीटर पेट्रोल (प्रति वाहन) आणि भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत दिलं जाणार असल्याचं नमूद केलं होतं. आज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे वाटप होणार होतं. 

वैभव नाईकांसमोर पेच...वैभव नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा कणकवली, वागदेमध्ये पेट्रोल पंप आहे. परंतू वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार आहेत. जो नारायण राणेंचा मतदारसंघ आहे. तेथून पहिल्यावेळी ते नारायण राणेंना हरवून निवडून आले होते. नाईकांचा पेट्रोल पंप त्यांच्या मतदारसंघात नसल्याने राजकीय उद्देशासाठी त्याचा ते वापर करू शकत नाहीत. तो पेट्रोल पंप नारायण राणेंचे आमदार पूत्र नितेश राणेंच्या मतदारसंघात आहे. मालवण शहरात एकच पेट्रोल पंप आहे, तो देखील राणेंच्याच मालकीचा आहे. यामुळे आता वैभव नाईकांना त्यांचे डावपेच फोल जाऊ द्यायचे नसतील तर कुडाळ शहराबाहेरील पेट्रोल पंपांचा आधार घ्यावा लागणार आहे. परंतू हे पेट्रोल पंप लांब असल्याने त्यांचा प्रयत्न तेवढा यशस्वी ठरणार नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप