shiv sena mla Pratap Sarnaiks reaction on ed raids in his office and house | ईडीच्या धाडींमुळे माझं तोंड बंद होणार नाही; सरनाईकांचा आक्रमक पवित्रा

ईडीच्या धाडींमुळे माझं तोंड बंद होणार नाही; सरनाईकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल (मंगळवारी) सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यानंतर परदेशात गेलेले प्रताप सरनाईक मायदेशी परतले. आता सरनाईक पितापुत्रांची ईडीनं चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या धाडीनंतर सरनाईक यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं. 

भाजप नेत्यांच्या चौकशा होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.

रिक्षा चालक ते १२६ कोटींचा मालक; जाणून घ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा प्रवास

ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 'या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. ईडीचे छापे पडले म्हणून प्रताप सरनाईकचं तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे,' अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. 

...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण'

'ईडीच्या लोकांनी माझं कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. मात्र त्यानंही त्यांचं समाधान झालेलं नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे', असं प्रताप सरनाईक म्हणाले. 

'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

टॉप्स एजन्सीसोबत असलेल्या आर्थिक संबंधांवरून सरनाईक ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरही सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं. 'विहंगसोबत माझं फोनवरुन बोलणं झालं. ईडीनं त्याला व्यवसायासंबंधी अनेक प्रश्न विचारले. टॉप्स नावाची एक एजन्सी आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मालकाचे आणि आपले काही आर्थिक संबंध, व्यवहार आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. पण त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. एक सुरक्षा एजन्सी म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या कार्यक्रमात त्यांचे सुरक्षारक्षक ठेवत असतो. त्याचे रितसर पैसेही दिले आहेत', असं सरनाईक यांनी सांगितलं. 

Web Title: shiv sena mla Pratap Sarnaiks reaction on ed raids in his office and house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.