Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:20 PM2021-06-14T23:20:45+5:302021-06-14T23:21:56+5:30

Maratha Reservation: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यानंतर शिवसेनेकडून टोला लगावण्यात आला आहे.

shiv sena arvind sawant reacts on sambhaji raje and udayan raje meet on maratha reservation | Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला

Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला

Next

मुंबई:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. याच विषयावर संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. दोन्ही राजांमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना दोन्ही राजांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. यानंतर शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया आली असून, दोन्ही राजे एकत्र आले. त्याचे स्वागत, पण त्यांचे बोलणे भाजपच्या मिठाला जागल्यासारखे आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. (shiv sena arvind sawant reacts on sambhaji raje and udayan raje meet on maratha reservation)

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच आक्रमक पद्धतीने भूमिकाही मांडली. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या भेटीवरून टोला लगावला आहे.

“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

ते मिठाला जागल्यासारखे बोलत आहेत

दोन्ही राजे एकत्र आले याचे स्वागत आहे, मात्र दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबाबत ते बोलत नाहीत. ते मिठाला जागल्यासारखे बोलत आहेत, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला. या वेळी खासदार अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवर देखील भाष्य केले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यघटनेनुसार निर्णय घेतला पाहिजे. मात्र यात केवळ राजकारण करण्याचे कामच सध्या सुरू आहे. यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, असा आरोप खासदार सावंत यांनी केला आहे.

राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. कुठल्याही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पण राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे. राजे हे सर्वांचे अर्थात सर्व समाजाचे असतात, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान मोदी

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावे. मराठा आऱक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. आधी राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावे, नंतर मी केंद्राचं पाहतो, असे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 
 

Web Title: shiv sena arvind sawant reacts on sambhaji raje and udayan raje meet on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.