राज ठाकरेंच्या टूरिंग टॉकिजच्या प्रयोगांना शरद पवारांची स्क्रिप्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:08 IST2019-04-17T06:08:10+5:302019-04-17T06:08:38+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली.

Sharad Pawar script for Raj Thackeray's touring talkies | राज ठाकरेंच्या टूरिंग टॉकिजच्या प्रयोगांना शरद पवारांची स्क्रिप्ट

राज ठाकरेंच्या टूरिंग टॉकिजच्या प्रयोगांना शरद पवारांची स्क्रिप्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टूरिंग टॉकिजची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असा आरोप शिक्षण मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल नांदेडमध्ये बोलताना राफेलचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. पण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना जी चपराक लगावली आहे व नोटीस दिली आहे, त्याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही.
यासंदर्भात जर त्यांनी खुलासा केला असता, त्यांचे म्हणणे जनतेला कळले असते असेही तावडे यांनी स्पष्ट केले. शेतकरी सन्मान योजनेचा अपप्रचार करणाऱ्या महाआघाडीच्या जाहिरातीवर बंदी आणण्याची मागणी आपण राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.

Web Title: Sharad Pawar script for Raj Thackeray's touring talkies