शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

Sharad Pawar Health: शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 5:05 PM

Sharad Pawar admited again in Breach Candy hospital: शरद पवारांच्या  पित्ताशयात खडे झाले आहेत. ज्याला गॉल स्टोन म्हणतात. मध्यंतरी पोटात दुखू लागले म्हणून ते उपचारासाठी आले होते. तपासणीअंती पित्ताशयात खडे आढळून आले.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढण्यात आला होता. शरद पवारांच्या गेल्या महिन्य़ात अचानक पोटात दुखू लागले होते. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy hospital) दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला. त्यामुळे बुधवारी पहाटे एंडोस्कोपीच्या साहाय्याने तो खडा दूर करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनी त्यांना सोडण्यात आले होते. आता पुन्हा त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. (surgery will take place tomorrow on Sharad pawar; Nawab malik gave information.)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार साहेबांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पवारांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

उपचारावेळी दिग्गज नेते रुग्णालयातखासदार पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या टीममध्ये डॉ. प्रतित समदानी, डॉ. सुलतान प्रधान तसेच डॉ. शहारुख गोलवाला, डॉ दप्तरी, डॉ. टिबडिवाला यांचा समावेश आहे. एन्डोस्कोपीवेळी रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह नातेवाईक आणि अन्य नेते उपस्थित होते. खा. पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत उपचार करणाऱ्याा डॉक्टरांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले होते.

शरद पवार यांना नेमका काय त्रास होता? पवारांच्या  पित्ताशयात खडे झाले आहेत. ज्याला गॉल स्टोन म्हणतात. मध्यंतरी पोटात दुखू लागले म्हणून ते उपचारासाठी आले होते. तपासणीअंती पित्ताशयात खडे आढळून आले.  शिवाय, त्यांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जात होते. ते औषध सुरू असताना ऑपरेशन करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते औषध थांबवून दोन-तीन दिवसांनी ऑपरेशन करू असे ठरले होते. मात्र, त्यातील एक खडा पित्तनलिकेत अडकल्यामुळे त्यांना वेदना वाढल्या.  कॉमन बोईल डक्टमधील खडा काढणे गरजेचे होते. त्यामुळे एण्डोस्कोपी करावी लागली.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारhospitalहॉस्पिटलnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस