शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याकडून पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 09:26 IST

NCP Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे.

अंबरनाथ - राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे. एका पोलिसावर दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. (Ambernath) ही घटना अंबरनाथ शहरामधील आहे. (Serious allegations against the party's city president by a woman NCP office bearer in Ambernath)राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या शहराध्यक्ष असलेल्या एका तरुणीने एका पोलिसावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सदर तरुणीने प्रमोद हिंदुराव या पोलिसावर आरोप केले होते. मात्र या पोलिसावर अद्याप कारवाई झालेली नाही. दरम्यान, या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असताना राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी आपल्यावर दबाव आणला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरही तक्रार मागे घेण्यासाठी २० लाख रुपये घेऊन देण्याचे आमिष दाखवले, अशा आरोप या तरुणीने केला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही नाईनने प्रसारित केले आहे.मात्र सदाशिव पाटील यांनी या महिला पदाधिकाऱ्याने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठीही मी कुणावरही दबाव टाकलेला नाही, असेही सदाशिव पाटील यांनी सांगितले. उलट ही तरुणी राष्ट्रवादीची पदाधिकारी असूनही भाजपाच्या मंचावर होती, असा प्रत्यारोप पाटील यांनी केला आहे.दरम्यान, या तरुणीने या प्रकरणी थेट जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच परवा सुप्रिया सुळे ह्या अंबरनाथमध्ये आल्या असताना त्यांच्याकडेही आपले म्हणणे मांडले. मात्र यादरम्यान, या तरुणीची पदावरून हकालपट्टी करून तिच्या जागी दुसऱ्या एका तरुणीची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, असा आरोप या तरुणीने केला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणambernathअंबरनाथthaneठाणे