शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:41 PM2021-03-28T13:41:47+5:302021-03-28T14:29:01+5:30

(Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah: प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या जवळच्या उद्योगपतीची अहमदाबादमध्ये भेट; भेटीवेळी पवारदेखील होते अहमदाबादमध्येच

Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah | शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

googlenewsNext

अहमदाबाद: अँटिलिया प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. भारतीय जनता पक्षानं गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं अडचणीत आलं आहे. यामुळे सरकारला काहीसं बॅकफूटवर जावं लागलं असताना दुसरीकडे गुजरातमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. हा उद्योगपती भाजपचा निकटवर्तीय मानला जातो. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Secret meeting between Sharad Pawar, Praful Patel and Amit Shah in ahmedabad)

अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

अँटिलिया प्रकरणात सुरुवातीला सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे अडचणीत आले. त्यावेळी भाजपनं वाझे आणि शिवसेनेचे संबंध पुढे आणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर देशमुख अडचणीत आले आणि शिवसेनेवर असलेला टीकेचा रोख राष्ट्रवादीकडे वळला. पवार यांनी देशमुख यांचं समर्थन करत त्यांचा राजीनामा घेतला नसला, तरी यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 

 

Web Title: Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.