"शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणाऱ्या सरकारच्या डीएनएमध्ये गोडसे आणि सावरकर"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 02:19 PM2020-12-13T14:19:25+5:302020-12-13T14:26:31+5:30

Samajwadi Party And Farmers Protest : समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहील असं साजन यांनी म्हटलं आहे. 

samajwadi party support of kisan andolan calls government godse sawarkar dna | "शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणाऱ्या सरकारच्या डीएनएमध्ये गोडसे आणि सावरकर"

"शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणाऱ्या सरकारच्या डीएनएमध्ये गोडसे आणि सावरकर"

googlenewsNext

नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात शनिवारी अनेक टोल नाके बंद केले होते. याच दरम्यान समाजवादी पार्टीने शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 

"देशातील शेतकरी वर्ग रास्त मागण्यांसाठी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात" असं समाजवादी पार्टीच्या सुनील सिंह साजन यांनी म्हटलं आहे. 

"अखिलेश यादव यांनी ठरवलं आहे की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गावोगावी फिरून कायद्याविरोधात निषेध नोंदवायचा आहे. आमंच्या विरोधात कितीही खटले दाखल करण्यात आले तरीही आम्ही थांबणार नाही. आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा आंदोलन दडपण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करण्यात आला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. शेवटपर्यंत समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहील" असं देखील साजन यांनी म्हटलं आहे. 

'समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील'

सुनील सिंह साजन यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यात आणि शहरात पक्ष कार्यालयात आमचे कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत निषेध नोंदवतील. सरकारला जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

"देशाला जाणून घ्यायचं आहे, 'राजधर्म' मोठा की 'राजहट्ट?'"; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान काँग्रेसने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंदोलनात 17 दिवसांमध्ये 11 शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागलं आहे मात्र तरी देखील मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "गेल्या 17 दिवसांमध्ये 11 शेतकरी बांधवांच्या बलिदानानंतरही निरंकुश मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. ते अजूनही अन्नदात्यांबरोबर नाहीतर धनदात्यांबरोबरच का आहेत? देशाला जाणून घ्यायचं आहे की "राजधर्म" मोठा की "राजहट्ट"?" असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: samajwadi party support of kisan andolan calls government godse sawarkar dna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.