शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Sachin Vaze: “एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 1:04 PM

Mukesh Ambani Bomb Scare, BJP Target Thackeray government: सध्या या प्रकरणात NIA तपास करत आहे, त्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, सचिन वाझे यांनाही NIA ने अटक केली आहे.

ठळक मुद्देपोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत लाखोंच्या नोटा आणि नोटा मोजायची मशीन सापडली...!सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या(NIA) पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे.ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती.

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती, या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली, परंतु या प्रकरणात विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर शंका उपस्थित केली, ज्यावेळी ही स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे आढळली, तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी सचिन वाझे त्याठिकाणी कसे पोहचले? आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सरकारने सचिन वाझेंनाच दिला असं त्यांनी सांगितलं होतं.(BJP Ashish Shelar Target Mahavikas Aghadi Government over Sachin Vaze Case) 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं शिवसेनेला काय लाभ होईल?; निवृत्त सनदी अधिकारी म्हणाले...

या प्रकरणात काही दिवसांनी जी स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर सापडली, तिचा मालक मनसुख हिरेन यांचा(Mansukh Hiren Death) मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदर खाडीत आढळला, या मृत्यूमुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं. विरोधकांनी NIA ची मागणी केल्यानंतर सध्या या प्रकरणात NIA तपास करत आहे, त्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, सचिन वाझे यांनाही NIA ने अटक केली आहे. या प्रकरणावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले की, पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत लाखोंच्या नोटा आणि नोटा मोजायची मशीन सापडली...! एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती तो तिघाडीचा "किमान समान कार्यक्रम" हाच का तो? असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून ‘एनआयए’च्या(NIA) पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. त्याच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.

त्याचबरोबर जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा  वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी  करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, ठाण्यातील  व्यापारी मनसुख हिरेन यांनी संशयास्पद मृत्यूपूर्वी याच गाडीतून प्रवास केला होता, असे समजते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपा