शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

"भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 13:58 IST

rohit pawar : रोहित पवार यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देरोहित पवार यांनी भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर कशाप्रकारे इंधनाच्या किंमती वाढल्या, हे पोस्टद्वारे सांगितले आहे.

मुंबई : इंधन दरवाढीवरुन राज्यात राजकारण तापले आहे. इंधन दरवाढ कमी व्हावी, यासाठी विरोधीपक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे राज्यातील इंधन दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करावा, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यांनी २०१४च्या निवडणुकांचे उदाहरणही दिले आहे. रोहित पवार यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा, असे म्हणत रोहित पवार यांनी भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर कशाप्रकारे इंधनाच्या किंमती वाढल्या, हे पोस्टद्वारे सांगितले आहे.

फेसबुक पोस्टद्वारे काय म्हणाले रोहित पवार?

"पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज गगनाला भिडल्यात, परिणामी आधीच उत्पन्न घटलेल्या नागरिकांना या वाढलेल्या किमतीची झळही सहन करावी लागतेय. आज पुण्यात पेट्रोलचा दर ९३ रुपये प्रती लिटर आहे. वास्तविक सगळ्याच कंपन्यांची पेट्रोलची बेसिक किंमत २९.३४ रुपये प्रती लिटरच्या घरात असून त्यात वाहतूक खर्च धरला तर डिलरला पेट्रोल ३० रुपये प्रति लिटर पर्यंत पडतं. केंद्राचा एकूण कर ३२.९८ रुपये, डीलरचं कमिशन ३.६९ रुपये तर राज्याचा कर २६ ते २७ रुपयाच्या दरम्यान आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, "केंद्राचे कर बघितले तर त्यात बेसिक एक्साइज ड्युटी १.४० रुपये, स्पेशल अडिशनल एक्साइज ड्युटी ११ रुपये, कृषि सेस २.५ रुपये, रस्ते आणि पायाभूत सुविधा सेस १८ रुपये असे एकूण ३२.९० रु एका लिटरमागे केंद्र सरकार वसूल करतं. या ३२.९० रु करापैकी केवळ बेसिक एक्साइज ड्युटीमध्येच राज्यांना वाटा मिळतो. सेस आणि स्पेशल अडिशनल एक्साइज ड्युटीमध्ये राज्यांना वाटा मिळत नाही," असे रोहित पवार म्हणाले.

"केंद्र सरकारची चलाखी बघायची असेल तर याचं एक ताजं उदाहरण बघता येईल. बजेटमध्ये केंद्राने २.५ रु प्रती लिटर कृषि सेस लावला आणि २.५ रुपये एक्साइज ड्युटी कमी केली. त्यात बेसिक एक्साइज ड्युटीमध्ये १.५ रुपये तर स्पेशल एक्साइज ड्युटीमध्ये १ रुपया कमी केला. पण यात महत्वाचं म्हणजे राज्यांना केवळ बेसिक एक्साइज ड्युटीमध्येच वाटा मिळतो आणि केंद्राने नेमकी त्यातच कपात केली. म्हणजे ग्राहकांसाठी किमती वाढल्या नाहीत पण पेट्रोल-डिझेलवरील करांच्या माध्यमातून राज्यांना वाटा द्यावा लागू नये आणि आपलेच खिसे भरताना जनतेचे खिसे कसे कापतो हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने ही चाल खेळली. अशा प्रकारे राज्यांचा खिसा कापल्यामुळं केंद्रीय करातील वाट्यापोटी राज्यांना मिळणारी रक्कम घटणार असून महाराष्ट्राला २०२१-२२ या आर्थिक वर्षात केवळ ४२०४३ कोटी रूपये मिळणार आहेत," असे रोहित पवार म्हणाले.

"२०१४ मध्ये भाजपाने सत्ता हातात घेतली तेंव्हा पेट्रोलवर ९.५ रु कर आकारला जात होता. आज हाच कर ३२.९० रु वर गेला. म्हणजेच त्यात तब्बल ३५०% नी वाढ झाली. डिझेलबाबत बघितलं तर २०१४ मध्ये केंद्र सरकार ३.५६ रु कर आकारात होतं, आज त्यात सुमारे ९००% वाढ झाली असून आज तो ३१.८० रु पर्यंत पोहचलाय. विशेष म्हणजे कच्या तेलाच्या किमती २०१४ तुलनेत आज निम्म्याने कमी झाल्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मात्र दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत आहेत. या दरवाढीमुळं वाहतूक खर्चात वाढ होऊन महागाई भडकतेच पण दुचाकीवरून शहराच्या ठिकाणी दूध, भाजीपाला विक्रीसाठी जाणारे शेतकरी, रिक्षाचालक, टेम्पो चालक, मच्छिमार यांच्या व्यवसायावरही परिणाम होतो," असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

"पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढून महागाई प्रचंड वाढल्याचं आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या जाहिराती अजून जनता विसरली नाही. पण त्या फक्त दिशाभूल करण्यासाठीच केल्या होत्या हे आता पेट्रोल-डिझेलच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या जनतेलाही कळलंय. त्यामुळं 'जनता माफ नहीं करेगी'चं बुमरँग भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही," असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

"कच्च्या तेलाच्या किंमती आज युपीए सरकारच्या काळात असलेल्या किंमती एवढ्या असत्या तर कर सूत्रानुसार पेट्रोलची किंमत १४० रु लिटरच्याही पुढं गेल्या असत्या आणि युपीए सरकारच्या काळात असलेले कर आज असते तर पेट्रोलची किंमत ५५ रु प्रति लिटरपेक्षाही कमी राहिली असती. सरकारने केवळ कर आकारून पैसे कमावणं महत्त्वाचं नसतं तर लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं असतं. परंतु हे केंद्र सरकारच्या लक्षात आलेलं नाही आणि ते येईल याचीही अपेक्षा नाही", असे रोहित पवार म्हणाले.

"जीएसटी कायद्यानंतर राज्यांच्या स्वतःच्या महसूलाच्या स्त्रोतांपैकी इंधनावरील एक्साइज हा महत्वाचा स्त्रोत आहे. कोरोना काळात राज्यांचा विशेषता महाराष्ट्राचा मोठा महसूल बुडाला. त्यात केंद्राचीही मदत नाही. एकीकडं नैसर्गिक आपत्ती, आरोग्य सुविधा याचा खर्च भरमसाठ वाढला, तर दुसरीकडं जीएसटी भरपाई देताना कोरोनाचं कारण सांगून केंद्र सरकारने राज्यांचा विश्वासघात केला," असा आरोपही त्यांनी केला आहे.

"आज केंद्रीय करातील वाट्यापोटी राज्याला ४८५०० कोटी रुपये येणं अपेक्षित असताना केंद्राकडून यात ३० % कपात झाली असून महाराष्ट्राला केवळ ३३७४२ कोटी रुपये मिळाले. राज्याला या वर्षात एकूण ३.४७ लाख कोटींचा महसूल अपेक्षित असताना जानेवारी अखेर पर्यंत  १.८८ लाख कोटींचा म्हणजेच केवळ ४६ % महसूल प्राप्त झाला," असे रोहित पवार यांनी सांगितले.

"अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारला कर कमी करायला लावण्याऐवजी उलट राज्य सरकारने कर कमी करावेत अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जातेय याला काय म्हणावं? अशी मागणी करणाऱ्यांना किमान जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी. फक्त आपल्या केंद्रीय नेत्यांची आरती गाण्यासाठी आणि त्यांची मर्जी राखण्यासाठी आपण स्वतःच्या राज्याच्या होणाऱ्या अपरिमित नुकसानीकडं किती डोळेझाक करायची याचं तरी भान त्यांनी ठेवायला हवं," असे म्हणत रोहित पवारांनी भाजपाच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPetrolपेट्रोलDieselडिझेलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस