‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:37 AM2021-08-04T09:37:27+5:302021-08-04T09:46:26+5:30

स्वतःला मोदींचा हनुमान मानणारे चिराग पासवान भाजपविरोधात बंडखोरी करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

rjd leader lalu prasad yadav want alliance between tejashwi yadav and chirag paswan | ‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले...

‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले...

Next
ठळक मुद्देलालू प्रसाद यादवांनी घेतली शरद यादव यांची दिल्लीत भेटबिहारमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणलालू प्रसाद यादव यांची चिराग पासवान यांना मोठी ऑफर

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून बिहारमधीलराजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतःला मोदींचा हनुमान मानणारे चिराग पासवान भाजपविरोधात बंडखोरी करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचे कारण म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी चिराग पासवान यांना मोठी ऑफर दिल्याचा कयास बांधला जात आहे. लालू प्रसाद यादव यांनी दिल्लीत शरद यादव यांची भेट घेतल्यानंतर आता चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे. (rjd leader lalu prasad yadav want alliance between tejashwi yadav and chirag paswan)

राजद नेते आणि माजी केंद्रीयमंत्री लालू प्रसाद यादव यांनी शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. लोकशक्ती जनता पक्षाचे नेते चिराग पासवान आणि तेजस्वी यादव एकत्र यावेत, अशी इच्छा लालू प्रसाद यादव व्यक्त केली आहे. यासंदर्भात चिराग पासवान यांना विचारण्यात आले असता, मी त्यांच्या भावनांचा आदर करतो, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. 

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

चिराग पासवान अजूनही लोजप नेते

लालू प्रसाद यादव यांना चिराग पासवान यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. यावर, चिराग पासवान अद्यापही लोजप नेते आहेत. अनेक वादविवादांनंतरही ते एक युवा नेते म्हणून उदयाला आले आहेत. चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांनी एकत्रितपणे काम करावे, अशी इच्छा लालू प्रसाद यादव यांनी बोलून दाखवली. लालू प्रसाद यादव आणि माझे वडील दिवंगत रामविलास पासवान यांच्यात चांगले संबंध होते. लालू प्रसाद यादवांच्या भावनांचा सन्मान करतो. माझ्या नेतृत्वाबाबत कौतुक केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र, आताच्या घडीला माझे संपूर्ण लक्ष राज्यव्यापी आशिर्वाद यात्रेवर असल्याचे चिराग पासवान यांनी नमूद केले.

चिंताजनक! कोरोनामुक्त झाल्यानंतर २ आठवडे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; लँसेटचा दावा

दरम्यान, बिहारमधील संयुक्त जनता दलाच्या संसदीय पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी, मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान पदाचे मटेरियल आहेत असे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता त्यांच्यात आहेत. पण आपण आता एनडीएत आहोत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. ते चांगले कामही करत आहेत असे उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याशिवाय अनेक जणांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यात नितीश कुमारही आहेत. यात कुठलेही दुमत नाही, असेदेखील कुशवाहा यांनी सांगितले.
 

Web Title: rjd leader lalu prasad yadav want alliance between tejashwi yadav and chirag paswan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.