शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Remdesivir: दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन, रात्री ताब्यात; फडणवीसांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 1:19 AM

Remdesivir issue, Devendra Fadanvis talk on Police detained Daman's company Bruck pharma owner at night: रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण  (Remdesivir injection) कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे. दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे भाजपाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis)आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर  (Pravin Darekar) यांनी तातडीने मुंबई पोलीस उपाआयुक्तांची भेट घेत जाब विचारला.

रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण  (Remdesivir injection) कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे. दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे भाजपाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis)आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर  (Pravin Darekar) यांनी तातडीने मुंबई पोलीस उपाआयुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेत जाब विचारला. या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली नव्हती तर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, असे उपाआयुक्तांनी सांगितल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. (Devendra Fadanvis talk on Police detained Daman's company Bruck pharma owner at saturday night in Remdesivir injection politics)

प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फार्मा (Bruck pharma ) कंपनीत दमनला गेले होते. महाराष्ट्राला रेमडेसीवीर द्या अशी विनंती केली होती. यावर कंपनीने सांगितलेले की, आम्हाला परवानगी दिली तर आम्ही आमच्याकडील साठा महाराष्ट्राला देण्यास तयार आहोत. यानुसार केंद्राला आम्ही विनंती केली की परवानगी द्यावी लागेल. यावर त्यांच्याशी टायअप करून देतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या लायसनवर परवानगी मिळेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 त्या कंपनीने जे रेमडेसीवीर इंजेक्शन बनविवले होते त्याला दमनच्या एफडीए आणि राज्याच्या एफडीएची परवानगी हवी होती. ती दिली गेली. दुपारच्यावेळी मंत्र्यांचे ओएसडी यांनी मालकाला फोन करून धमकी दिली. असे कसे देवेंद्र फडणवीस, दरेकरांच्या सांगण्य़ावरून रेमडेसीवीर देत आहात. रात्री ९ वाजता आम्हाला मेसेज आला की १० पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून आणले. हे कसले राजकारण सुरु आहे. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. परंतू जे काही सुरु आहे ते दिसतेय, असा आरोप फडणवीस यांनी केला. 

डीसीपी आता सांगत आहेत की, टीप मिळाली होती, की ६०००० इंजेक्शन त्यांच्याकडे आहेत. यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतले. आम्ही त्यांना अटक करणार नव्हतो. चौकशीला बोलावले होते. राज्याला रेमडेसीवीर पाठविण्याची वेळ असताना त्या कंपनीच्या मालकाला इथे आणून बसविण्यात आले. हे कसले राजकारण आहे? जर ते सर्व परवानगी घेऊन राज्याला रेमडेसीवीर देत असतील आणि जर त्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर हे चुकीचे आहे, सहन केले जाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आता त्या व्यक्तीला पोलिसांनी सोडले आहे. आपण पोलिसांवर विश्वास ठेवू, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकरMumbai policeमुंबई पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस