राठोडांचे मंत्रिपद गेले; पश्चिम वऱ्हाडात आशा पुन्हा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:22 IST2021-03-01T05:21:59+5:302021-03-01T05:22:25+5:30

रायमुलकर, बाजाेरिया, देशमुख इच्छुक. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे विधानसभेत तीन तर विधानपरिषदेत एक सदस्य आहे.

Rathore's ministry was gone; In the West, hope is restored | राठोडांचे मंत्रिपद गेले; पश्चिम वऱ्हाडात आशा पुन्हा पल्लवीत

राठोडांचे मंत्रिपद गेले; पश्चिम वऱ्हाडात आशा पुन्हा पल्लवीत


राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क 
अकोला : वनमंत्री संजय राठाेड यांनी राजीनामा दिल्यामुळे विदर्भातील एक मंत्रिपद कमी झाले आहे, त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.


अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे विधानसभेत तीन तर विधानपरिषदेत एक सदस्य आहे. पश्चिम विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिमचे पारडे जडच आहे. दुसरीकडे सामाजिक समीकरण लक्षात घेऊन यवतमाळमधील संजय राठाेड यांना मंत्रिपदाची संधी मिळाली हाेती. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील आ. डाॅ. संजय रायमुलकर व आ. गाेपीकिशन बाजाेरिया या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले हाेते. राठाेड यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांच्या दाव्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.


बुलडाण्याचे डाॅ. रायमुलकर यांना सध्या पंचायतराज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रिपदासाठी खा. प्रतापराव जाधव यांनीही माताेश्रीवर साकडे घातले हाेते. मात्र त्यांची समजूत घालण्यात आली. अकाेल्याचे आ. बाजाेरिया यांचाही मंत्रिपदासाठी दावा प्रबळ हाेता. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात त्यांचे नाव मागे पडले. आता त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या दाेन ज्येष्ठ आमदारांसह पहिल्यांदाच निवडून आलेले अकाेल्यातील बाळापूरचे आ. नितीन देशमुख व बुलडाण्याचे संजय गायकवाड या दाेघांचीही मंत्रिपदासाठी दावेदारी मानली जाते. पहिल्यांदाच निवडून आल्यावरही त्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाची छाप पाडली आहे. 

राष्ट्रवादीचे एकच आमदार थेट कॅबिनेट
राज्यात सत्तांतर हाेत असताना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे साक्षीदार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ. राजेंद्र शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवेसनेचे चार सदस्य असतानाही एकालाही मंत्रिपद नसल्याचे शल्य शिवसैनिकांमध्ये आहे.

Web Title: Rathore's ministry was gone; In the West, hope is restored