शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे”; भाजपा आमदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:05 IST

एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता

ठळक मुद्देअयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहेभाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला प्रहार

मुंबई – अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून देशभरात राजकारण सुरु झालं आहे. राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीचे अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे साडे १८ कोटी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाने याबाबत पत्रकार परिषद घेत राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. यावर शिवसेनेनंही भाष्य केले होते.(BJP Mla Nitesh Rane Target Shivsena over Ram Mandir Land Scam Issue)

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता. त्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी(BJP Nitesh Rane) त्यांना टोला लगावला आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी असं बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये. लायकीत राहावे अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.

शिवसेनेनं काय म्हटलं?

राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त १० मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काही मिनिटांत झाला संशयास्पद व्यवहार

संबंधित जमीन १८ मार्च रोजी सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. हा व्यवहार सायंकाळी झाला होता.  त्यानंतर पाच मिनिटांमध्येच ट्रस्टने ही जागा १८.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. अवघ्या काही मिनिटांमध्येच भूखंडाची किंमत एवढ्या प्रमाणात वाढली.

बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदीचा दावा

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील जमिनीचे भाव वाढले आहेत. संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवतShiv Senaशिवसेना