शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Rajasthan Political Crisis: प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:59 AM

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्याशी मागील ३-४ दिवसांपासून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी रोज संपर्कात आहेत

नवी दिल्ली – राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही सुरु आहे, हे प्रकरण आता कोर्टात पोहचलं आहे, आज यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. पण या संपूर्ण घडामोडीत अद्यापही काँग्रेसला आशा आहे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठे नेते सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधत आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या स्वत: सचिन पायलट यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

माध्यमांनुसार, सचिन पायलट यांच्यासोबत मागील ३-४ दिवसांपासून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी रोज संपर्कात आहेत. पण दोघांमध्ये काय चर्चा झाली, प्रकरण कुठपर्यंत पोहचलं आहे याची माहिती मिळू शकली नाही. इतकचं नाही तर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सचिन पायलट यांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संवाद करुन नाराजी दूर करावी असं सांगितलं आहे पण पायलट यांनी तो प्रस्ताव नाकारला आहे. पायलट यांच्या या पवित्र्यानंतर पक्षाने त्यांच्यावर  कारवाई केली. (Rajasthan Political Crisis)

दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादावर भाजपाची करडी नजर आहे ते सध्या वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या संघर्षात भाजपा कोणत्याही प्रकारे घाई करणार नाही. राजस्थान भाजपा अध्यक्ष सतीश पूनिया यांनी सांगितले की, आम्ही अशोक गहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार नाही. तर सचिन पायलट यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर आम्ही कोणाला निमंत्रण देणार नाही, जर कोणी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पक्षाचे वरिष्ठ राजस्थानच्या सत्तासंघर्षावर नजर ठेवून आहेत असं त्यांनी सांगितले.

तर काही नेत्यांचे म्हणणे आहे की, जर पक्षाने योग्य वेळी फायदा उचलला नाही तर मुर्खपणा ठरेल. रिपोर्टनुसार राहुल गांधी यांचीही सचिन पायलट काँग्रेसमध्ये राहावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी राहुल गांधी(Rahul Gandhi) पायलट यांच्या सन्मानपूर्वक वापसीसाठी वातावरण तयार करत आहेत. तसेच बंडखोर आमदारांविरोधात राहुल गांधींनी नरमाईची भूमिका घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या भूमिकेबद्दल लोकांना उत्सुकता आहे, काँग्रेसही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं दिसून येतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...

 ‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार

आजपासून ग्राहकांना मिळणार 'हे' नवीन अधिकार; दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना चाप बसणार

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी