शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

प्रियंका गांधी यांच्या एंट्रीमध्ये भाजपा शोधतेय स्वत:चा फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:43 AM

प्रियंका गांधी-वाड्रा राजकीय मैदानात उतरल्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा केला जात असतानाच भाजपाही उत्तर प्रदेशात याचा फायदा कसा घेता येईल, याची रणनीती तयार करत असल्याचे समजते.

संतोष ठाकुर नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा राजकीय मैदानात उतरल्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा केला जात असतानाच भाजपाही उत्तर प्रदेशात याचा फायदा कसा घेता येईल, याची रणनीती तयार करत असल्याचे समजते. प्रियंका गांधी-वाड्रा प्रचारात मुस्लीम, दलित आणि ब्राह्मण यांच्या मुद्द्यांवर अधिक भर देतील. त्याचा फटका सपा आणि बसपला होईल, अशी भाजपाच्या गोटात चर्चा आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन अंतिम फायदा भाजपालाच होईल, असा तर्क लावला जात आहे.भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, प्रियंका यांच्या एंट्रीमुळे ब्राह्मण-राजपूतांच्या २ टक्के मतांचा काँग्रेसला लाभ होऊ शकतो. तसेच एकूण मुस्लीम मतांपैकी जवळपास ९ ते १० टक्के मते काँग्रेसकडे खेचली जाऊ शकतात. ही सपा-बसपा, रालोदची व्होटबँक आहे. त्यामुळे सहाजिकच या तिन्ही पक्षांना फटका बसेल व भाजपाला मतविभाजनाचा फायदा होईल. प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. ज्या भागात त्या आपला प्रभाव दाखवतील, त्या भागात मतांचे विभाजन होईल, असा दावा या नेत्याने केला.प्रियंका यांचीच मागणी वाढेलभाजपाच्या अन्य एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, प्रियंका यांचा प्रभाव बघून काँग्रेसमध्ये त्यांच्याच सभांची अधिक मागणी होईल. मात्र आता ही निवडणूक हेही दाखवून देईल की २०२४मध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका यांच्यापैकी लोकप्रिय कोण आहे, हेही बघायला मिळेल.>प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही पत्नी प्रियंकाचे अभिनंदन केले आहे. या आयुष्याच्या नवीन टप्प्यावर मी कायम तुझ्या सोबत असेन, अशी पोस्ट रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर टाकली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियांका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९