पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्ला, भाजपा खासदारांना दिला खास सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 01:28 PM2021-07-20T13:28:38+5:302021-07-20T13:31:19+5:30

Narendra Modi News: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे.

Prime Minister Narendra Modi attack on the Congress & opposition, gave special advice to BJP MPs | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्ला, भाजपा खासदारांना दिला खास सल्ला 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्ला, भाजपा खासदारांना दिला खास सल्ला 

googlenewsNext

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी सोमवारपासून सुरू झाले आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाच्या खासदारांना महत्त्वपूर्ण सल्लाही दिला. काँग्रेसकडून पसरवण्यात येत असलेल्या असत्याला सत्याने हरवा, असा सल्ला त्यांनी दिला. (Prime Minister Narendra Modi attack on the Congress & opposition, gave special advice to BJP MPs)

मोदी म्हणाले की, आधी साथीचे आजार यायचे तेव्हा लोक आजारपणामुळे कमी आणि भूकेने अधिक मरायचे. मात्र आम्ही कुणालाही उपाशी राहू दिले नाही. देशातील ८० कोटी लोकांना सातत्याने धान्य पुरवले. यावेळी भाजपाच्या खासदारांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सत्त म्हणजेच सरकारच्या कामाला जनतेपर्यंत पोहोचवा. सत्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. कोरोना विषाणूमुळे आलेले संकट हे आमच्यासाठी राजकारण नाही तर मानवतेचा विषय आहे.

तुम्ही देशातील नागरिकांना तुम्ही कोरोनाविरोधात भारत कसा लढला आणि जगात काय परिस्थिती होती, याबाबत तुलना करून माहिती द्या. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, संसदेमध्ये अधिकाधिक वेळ उपस्थित राहा, अशी सूचनाही पंतप्रधान मोदींनी यावेळी खासदारांना दिली. या बैठकीत पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेस सर्व ठिकाणी संपत चालली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस सर्व ठिकाणी संपुष्टात येत आहे. मात्र त्यांना त्यांची चिंता नाही आहे. तर ते आमची चिंता करत आहे. केरळ, बंगाल आणि आसाममध्ये पराभूत झाल्यानंतरही त्यांची झोप गेलेली नाही, असे मोदी पुढे म्हणाले.

दिल्लीमध्ये २० टक्के फ्रंटलाईन वर्कर्स अद्याप व्हॅक्सिनेटेड झालेले नाहीत, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली. तसेच देशामध्ये कोरोनाच्या लसीचा तुटवडा नाही आहे. मात्र लसीबाबत नकारात्मक वातावरणनिर्मिती कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही मोदींनी यावेळी केला. 

Web Title: Prime Minister Narendra Modi attack on the Congress & opposition, gave special advice to BJP MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.