शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 08:29 IST

Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिला. तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच आहे.

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी तीन दिवसांपूर्वी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच सोमवारपासून (१ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं विधिमंडळात विरोधकांकडून या विषयावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) राठोड यांचा राजीनामा घेतला.5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखलमुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून ३ दिवस होत आले आहेत. मात्र राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धावनेमकी प्रक्रिया काय?एखाद्या मंत्र्यानं पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्यावर मुख्यमंत्री कार्यालय तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवतं. त्यानंतर राज्यपाल तो राजीनामा स्वीकारतात. त्यानंतर संबंधित मंत्री पदावरून दूर होतो. मग सरकारकडून एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं जातं. संबंधित खात्याचा पदभार कोणाकडे सोपवण्यात आला, याची माहिती त्यात असते.पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर उघडलं; शवविच्छेदन अहवालातून मिळाली महत्त्वाची माहितीराठोड अजूनही मंत्रिपदीमुख्यमंत्री कार्यालयानं राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेलाच नाही. सरकारकडून कोणतंही नोटिफिकेशन काढण्यात आलेलं नाही. वनमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे, याबद्दल सरकारनं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वन मंत्रिपदावर कायम आहेत.राठोड यांचा राजीनामा केवळ फार्स?मुख्यमंत्री कार्यालयानं राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नसल्यानं रविवारी घेण्यात आलेला राजीनामा निव्वळ फार्स होतो का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला का, अशी चर्चा रंगू लागली आहे. काय म्हणाले होते मुख्यमंत्री?पूजा चव्हाण प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे संजय राठोड अडचणीत आले. राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाले. कथित ऑडिओ क्लिपमुळेदेखील राठोड यांच्या समस्या वाढल्या. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतला. त्यानंतर रविवारी राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्याच संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राठोड यांचा राजीनामा काही फ्रेम करून लावण्यासाठी घेतलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPooja Chavanपूजा चव्हाण