शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कुरघोडीच्या राजकारणाने माढ्याचा फड रंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 4:33 AM

माढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

- समीर इनामदारमाढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.राष्टÑवादी काँग्रेसकडून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर रिंगणात आहेत.संजय शिंदे यांना माढा वगळता इतर तालुक्यांत मताधिक्य मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणास संजय शिंदे यांनी विरोध केल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध प्रचारास प्रारंभ केला आहे.त्याच वेळी संजय शिंदे आपण पाण्याच्या बाजूने आहोत, आपला विरोध नाही, हे सांगताना दिसत आहेत.संजय शिंदे यांच्याकडून आ. गणपतराव देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे यांनी प्रचारास जोर लावला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून आ. प्रशांत परिचारक, आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, आ. नारायण पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, कल्याणराव काळे यांनी प्रचाराची आघाडी उघडली आहे.दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वैयक्तिक आरोपांची राळ उडविली जात आहे. काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी राष्टÑवादीचा प्रचारकरण्यास नकार दिल्याने संजय शिंदे यांची गोची झाली आहे. एकेकाळचे मित्र आता राजकारणात शत्रू बनल्याचे या निवडणुकीतून दिसून आलेआहे. शरद पवार, अजित पवार यांनीही संजय शिंदे यांच्यासाठी सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर त्याचा अधिक फायदाहोईल, अशी अपेक्षा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आहे.वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे हेदेखील लढतीत आहेत. तेकिती मते मिळवितात, यावर बरेच अवलंबून आहे.>सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षांपासून माढा लोकसभा मतदारसंघात काम करीत आहोत. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्याचा फायदा आम्हाला होईल.- संजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस>आमची लढाई संजय शिंदे यांच्याविरुद्ध नसून, बारामतीच्या शरद पवारांविरुद्ध आहे. या भागातील सिंचन, पाण्याचा प्रश्न जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आला. याची दखल मतदार निश्चितपणे घेतील.- रणजितसिंह निंबाळकर,भाजप>कळीचे मुद्देपाणी, सिंचनाचे प्रश्न, ऊसदर हे मुख्य मुद्दे आहेत. रखडलेल्या प्रकल्पांवर अधिक भर.मोहिते-पाटील यांच्यासह अनेक नेते भाजपकडे. पाण्याच्या मुद्द्यावर एकमेकांना घेरण्याची तयारी.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019madha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर