Politics: Congress prepares for fight On its own in upcoming elections, NCP Shivsena | Maharashtra Politics: आगामी निवडणुकीत काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची तयारी; महाविकास आघाडीत बिघाडी?

Maharashtra Politics: आगामी निवडणुकीत काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची तयारी; महाविकास आघाडीत बिघाडी?

ठळक मुद्देसध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेतपक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहा.चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल

मुंबई – राज्यात सत्तांतर होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, यातच ग्रामपंचायतीपासून विविध पातळीवर निवडणुका झाल्या, त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकमेकांशी तडजोड करून निवडणुका लढवल्या, मात्र राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढवणार का? याबाबत संभ्रम आहे, यातच काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी एकलो चलो रे भूमिका स्वीकारल्याचं दिसून येतं. (Congress State President Nana Patole has instructed the office bearers to be ready to fight on their own in upcoming municipal elections including Navi Mumbai, KDMC, Vasai-Virar & Thane)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी कामाला लागा असा आदेशच त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहा. महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा अशा स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

त्याचसोबत कल्याण डोंबिवलीचा आढावा घेताना प्रतांध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन उपस्थित आहेत का हे पाहिले. काँग्रेसचे सैनिक म्हणून काम करा. पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे त्यांना सोबत घ्या. काँग्रेस पक्षात सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला. या आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काही अडचणी मांडल्या व काही सुचनाही केल्या. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन पक्ष त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला

Web Title: Politics: Congress prepares for fight On its own in upcoming elections, NCP Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.