शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 05:45 IST

कुठे महाआरती तर कुठे आनंदोत्सव

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’नंतर महाराष्ट्रात सोमवारी प्रथमच धार्मिकस्थळे उघडण्यात आली. शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेनेतर्फे महाआरती तर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला व प्रार्थनास्थळांचे श्रेय लाटण्याची चढाओढ सामान्यांनादेखील दिसून आली.

टेकडी गणेश मंदिरातशिवसेनाच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी सकाळच्या वेळी महाआरती केली व तेथे पोहोचलेल्या भाविकांना प्रसादाचे वितरण केले. याचप्रकारे सूर्यनगरस्थित दुर्गा मंदिर, गरीब नवाजनगर येथील शीतला माता मंदिर, राममंदिर, तेलंगखेडी हनुमान मंदिर आणि नागमंदिर येथेदेखील महाआरती करण्यात आली. 

दुसरीकडे मागील काही दिवसापासून प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंदिरांसमोर हे आयोजन झाले. आमच्या पक्षाच्या आंदोलनामुळेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. वर्धा मार्गावरील साईमंदिरासमोर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तर पोद्दारेश्वर राममंदिरात आरतीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  भवानी माता मंदिर येथेदेखील जल्लोष करण्यात आला.

मनसेचादेखील दावाभाजप-सेनेसोबतच मनसेनेदेखील प्रार्थनास्थळे त्यांच्याच पक्षामुळे उघडल्याचा दावा केला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मनसे पदाधिकारी यांनी गणेशपेठ स्थित आग्याराम देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेत पूजा अर्चना केली व जनतेला कोरोना संकटापासून मुक्ती मिळावी याकरिता प्रार्थना केली. 

टॅग्स :TempleमंदिरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेcorona virusकोरोना वायरस बातम्या