Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:17 AM2021-04-06T08:17:46+5:302021-04-06T08:26:01+5:30

A team of CBI officers will arrive in Mumbai: हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले.

Param Bir Singh: Anil Deshmukh in Delhi, CBI team in Mumbai today to probe corruption allegations | Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

Next
ठळक मुद्देमुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले होते. वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते अनिल देशमुख सध्या दिल्लीत असले तरी आज सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होत आहेत

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपामुळं राज्यात मोठी खळबळ माजली होती. विरोधकांनी या प्रकरणी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली परंतु ठाकरे सरकारनं माजी न्यायमूर्तींची चौकशी समिती लावून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करू अशी भूमिका घेतली. मात्र या आरोपाच्या आधारे सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.(CBI team to arrive in Mumbai today to probe corruption allegations against Anil Deshmukh) 

हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले, त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला. अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याचा कारभार सोपवला. सोमवारी राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांनी दिल्ली गाठली. हायकोर्टाच्या आदेशाला अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यासाठी रात्री त्यांनी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

अनिल देशमुख सध्या दिल्लीत असले तरी आज सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप लावले आहेत. त्याचा तपास करण्यासाठी सीबीआय(CBI) मुंबईत येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे १५ दिवसांत १०० कोटी वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत जर काही तथ्य आढळलं असेल तर सीबीआयला FIR नोंद करण्याच्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत.

काय होता परमबीर सिंगाचा आरोप?

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.

राजीनामा पत्रात अनिल देशमुख काय म्हणाले?

मा.ना. श्री. उद्धव ठाकरेसाहेब,

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत आज दि. ५ एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशान्वये अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या उचित वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला मंत्री (गृह) पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.

आपला नम्र,

अनिल देशमुख

शरद पवारांचे विश्वासू शिलेदार नवे गृहमंत्री

अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे.

Read in English

Web Title: Param Bir Singh: Anil Deshmukh in Delhi, CBI team in Mumbai today to probe corruption allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.