शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Pandharpur Election Results Live: भाजपकडून राष्ट्रवादीच्या भालकेंचा 'करेक्ट कार्यक्रम'; आवताडेंचा ३५०३ मतांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 17:34 IST

Pandharpur by election 2021 Result Live Updates :पंढरपूर पोटनिवडणूक २०२१: राष्ट्रवादीला धक्का; भारत भालकेंचे पुत्र भगीरथ यांचा पराभव

ठळक मुद्देपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

02 May, 21 05:30 PM

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेली मतं

02 May, 21 05:29 PM

समाधान आवताडे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे नवे आमदार; ३ हजार ५०३ मतांनी आवताडे विजयी

02 May, 21 05:27 PM

भाजपच्या समाधान आवताडेंना १ लाख ७ हजार ७७४ मतं; तर राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंना १ लाख ४ २७१ मतं

02 May, 21 03:11 PM

३८ व्या फेरीची मतमोजणी संथगतीने

३८ व्या फेरीची मतमोजणी संथगतीने; अधिकृत अंतिम निकाल थांबला.
 

02 May, 21 03:02 PM

३७ व्या फेरीअखेर भाजपाची आघाडी

भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी ६०१० मतांनी आघाडी घेतली आहे.
 

02 May, 21 02:05 PM

भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

पोटनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी भाजपा कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.

02 May, 21 02:01 PM

पंढरपुरात भाजपा आघाडीवर, समाधान आवताडे विजयाच्या उंबरठ्यावर

भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 35 व्या फेरीअखेर 4549  मतांची आघाडी घेतली असून जवळपास ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
 

02 May, 21 01:28 PM

समाधान आवताडेंची आघाडी कायम

२९ व्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांची ६३३१ मतांची आघाडी कायम आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर आहेत.
 

02 May, 21 12:26 PM

राष्ट्रवादी पिछाडीवर, भाजपाची आघाडी कायम

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांची आघाडी कायम असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे मतमोजणी कक्षात आलेले भालके यांचे समर्थक मतदान केंद्रातून बाहेर जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

02 May, 21 12:13 PM

मंगळवेढा तालुक्यातील गावांची मतमोजणी

२३ व्या फेरीपर्यंत मंगळवेढा शहरातील मतदानाची मतमोजणी होणार आहे. २४ व्या फेरीपासून मंगळवेढा तालुक्यातील गावांची मतमोजणी होणार आहे.

02 May, 21 12:12 PM

२१ व्या आणि २२ व्या फेरीत समाधान आवताडेंची आघाडी

२१ व्या आणि २२ व्या फेरीत सुद्धा भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. २१ व्या फेरीअखेर समाधान आवताडे यांनी ३४८६ मतांनी आघाडीवर आहेत, तर २२ व्या फेरीअखेर ३९०० मतांची आघाडी घेतली आहे.

02 May, 21 11:54 AM

समाधान आवताडे यांना 1022 मतांची आघाडी 

19 व्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 1022 मतांची आघाडी घेतली आहे. १९ ते ३८ फेरीत मंगळवेढा तालुक्यातील मतदानाची मतमोजणी होत आहे. 

02 May, 21 11:31 AM

मंगळवेढा तालुक्यातील मतदानाची मतमोजणी 

मंगळवेढा तालुक्यातील मतदानाची मतमोजणी १९ ते ३८ फेरीत होणार आहे.

02 May, 21 11:26 AM

पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली

सोलापूर : पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली; मंगळवेढ्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

02 May, 21 11:25 AM

भाजपाचे समाधान आवताडे 4100 मतांनी आघाडीवर

18 व्या फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे यांनी 4100 मतांनी आघाडी घेतली आहे.

02 May, 21 11:08 AM

कासेगाव खर्डी गावातून मताधिक्य

पंढरपूर शहरानंतर कासेगाव खर्डी गावातून भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांना मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते.

02 May, 21 11:04 AM

१५ व्या फेरीअखेर समाधान आवताडे

१५ व्या फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे ३८०० मतांनी आघाडीवर आहेत.
 

02 May, 21 10:52 AM

११ आणि २२ व्या फेरीत समाधान आवताडे आघाडीवर

भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे ११ आणि २२ व्या फेरीत समाधान आवताडे आघाडीवर आहे. अकराव्या फेरीअखेर समाधान आवताडे यांनी १५०३ मतांची आघाडी घेतली, तर १२ व्या फेरीअखेर १४०९ मतांची आघाडी घेतली.

02 May, 21 10:37 AM

समाधान आवताडेंची १८३८ मतांनी आघाडी

दहाव्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी १८३८ मतांची घेतली आघाडी

02 May, 21 10:26 AM

नवव्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडेंची आघाडी 

सोलापूर : नवव्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी 2357 मतांनी आघाडी घेतली आहे.

02 May, 21 10:23 AM

पंढरपूर तालुक्यात समाधान आवताडेंची आघाडी

पंढरपूर तालुक्यातील मतांची मतमोजणी सुरू आहे. ज्या भागात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती, त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगली आघाडी घेतली आहे.

02 May, 21 10:15 AM

चौथ्या आणि पाचव्या फेरीत भालके आघाडीवर

चौथ्या आणि पाचव्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत भगीरथ भालके ६३८ मतांनी आघाडीवर, तर पाचव्या फेरीत भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर आहेत.
आवताडे - १४०५९
भालके - १४७१७
सिद्धेश्वर आवताडे - ५४
शैला गोडसे - २४३
सचिन शिंदे - २२८
अभिजीत बीचुकले - ११

आता पर्यंत मोजलेली मते - ३०१९१

02 May, 21 10:11 AM

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतदानात भालकेंची आघाडी



 

02 May, 21 09:53 AM

तिसऱ्या फेरीत भगीरथ भालके ६३५ मतांनी आघाडीवर...

पहिल्या फेरीत समाधान आवताडे ३५० मतांनी आघाडीवर, दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके ११४ मतांनी आघाडीवर, तिसऱ्या फेरीत भगीरथ भालके ६३५ मतांनी आघाडीवर...

भालके - ८६१३
आवताडे - ७९७८
शैला गोडसे - १४०
सचिन शिंदे - २००
सिद्धेश्वर आवताडे - ३३
आता पर्यंत मोजलेली मते - १७४८६

02 May, 21 09:39 AM

भगीरथ भालके ११४ मतांनी पुढे

सोलापूर : दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ११४ मतांनी पुढे

02 May, 21 09:09 AM

पोस्टल मताच्या पहिल्या फेरीत भालके आघाडीवर

पोस्टल मते (फायनल)
एकूण मते ३७१२
- समाधान अवताडे(भाजपा) १३७२
- भगीरथ भालके (राष्ट्रवादी) २३१०
- शैला गोडसे(अपक्ष) ३०

02 May, 21 08:58 AM

घरी बसून निकाल ऐका, स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश देण्यात आले असून नागरिकांनी घरी बसून निकाल ऐका, असे स्थानिक प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
 

02 May, 21 08:51 AM

मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त



 

02 May, 21 08:45 AM

मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

02 May, 21 08:36 AM

१४ टेबलावर मतमोजणी

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या ३८ फेऱ्यामधून १४ टेबलावर मतमोजणी, तीन टेबलवर टपाली मतमोजणी सुरु.

02 May, 21 08:10 AM

पंढरपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
 

02 May, 21 07:24 AM

८ वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी ८ वाजल्यापासून सुरू होणार



 

02 May, 21 07:24 AM

19 उमेदवार रिंगणात 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र,  तुल्यबळ लढत ही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपाचे समाधान आवताडे अशीच पाहायला मिळाली.
 

02 May, 21 07:20 AM

भारत भालकेंची हॅट्रिक

दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता.

टॅग्स :Pandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021PandharpurपंढरपूरMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण