UP Panchayat Elections : रामाच्या अयोध्येत भाजपाची दाणादाण, अखिलेश यादवांच्या सपाने मारले मैदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:55 PM2021-05-03T20:55:05+5:302021-05-03T20:55:33+5:30

UP Panchayat Elections: नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला अयोध्येमध्ये जोरदार धक्का बसला आहे. 

UP Panchayat Elections: Big blow to BJP in Ayodhya, SP took the lead in UP Panchayat Elections | UP Panchayat Elections : रामाच्या अयोध्येत भाजपाची दाणादाण, अखिलेश यादवांच्या सपाने मारले मैदान 

UP Panchayat Elections : रामाच्या अयोध्येत भाजपाची दाणादाण, अखिलेश यादवांच्या सपाने मारले मैदान 

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या उभारणीस झालेली सुरुवात ही भाजपासाठी बाब भाजपासाठी फायदेशीर मानली जात होती. मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला अयोध्येमध्ये जोरदार धक्का बसला आहे.  (UP Panchayat Elections)पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजण्यात येणाऱ्या या निवडणुकीत अयोध्येतील मतदारांनी भाजपाची दाणादाण उडवली आहे. तर अखिलेश यादवांच्या सपाला आघाडी मिळाली आहे. (Big blow to BJP in Ayodhya, SP took the lead in UP Panchayat Elections)

अयोध्येतील मतमोजणीच्या कलांमध्ये सपाने जोरदार आघाडी घेतली आहे. ४० पैकी २४ जागांवर सपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपाला केवळ ८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर उर्वरित जागांवर इतर आघाडीवर आहेत. मात्र निवडणुकीचे पूर्ण कल अद्याप हाती आलेले नाही. मात्र सुरुवातीच्या कलांनी भाजपाची डोकेदुखी वाढवली आहे. 

उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३०५० जागांपैकी ७०२ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. समाजवादी पार्टी ५०४ जागांवर आघाडीवर आहे. बसपा १३२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ६०८ जागांवर आघाडीवर आहे. 

दरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपाला बसत असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी आंदोलनामुळे या भागात भाजपाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. बागपतमध्ये बहुतांश जागांवर आरएलडीने आघाडी घेतली आहे. तर भाजपा मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला आहे. 

Web Title: UP Panchayat Elections: Big blow to BJP in Ayodhya, SP took the lead in UP Panchayat Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.