ऑक्सिजन वाद: 'मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का ?'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:34 PM2021-07-21T16:34:41+5:302021-07-21T16:35:04+5:30

Chitra Wagh responds to Sanjay Raut: 'केंद्र सरकारवर खोटं बोलत आहे, त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे'

Oxygen controversy: 'Will Sanjay Raut sue the state government now?' says Chitra Wagh | ऑक्सिजन वाद: 'मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का ?'

ऑक्सिजन वाद: 'मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का ?'

googlenewsNext
ठळक मुद्दे'राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.'

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही' असे लिखीत व्यक्तव्य त्यांनी संसदेत केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी उत्तर दिलं आहे. 

ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नाही अस प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिलयं. मग, राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.

काय म्हणाले होते संजय राऊत ?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतदरम्यान संजय राउत म्हणाले, "केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा,"अशी मागणी राऊतांनी केली.    

काय म्हणाल्या डॉ. भारती पवार ?
काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का ? त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, "आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत सरकारला अंधळी आणि असंवेदनशील म्हटले. 
 

Web Title: Oxygen controversy: 'Will Sanjay Raut sue the state government now?' says Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.