Nana Patole : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन; महाराष्ट्राची जनताच त्यांना संन्यास देईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:25 PM2021-06-28T18:25:45+5:302021-06-28T19:59:18+5:30

OBC Reservation: Congress Nana Patole Target BJP Devendra Fadnavis and Central Government: भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षण संपुष्टात आणण्याची ही खेळी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वारंवार आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ठेवून आरक्षणविरोधी वातावरण निर्मिती केली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे.

OBC Reservation: Congress Nana Patole Target BJP Devendra Fadnavis and Central Government | Nana Patole : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन; महाराष्ट्राची जनताच त्यांना संन्यास देईल”

Nana Patole : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन; महाराष्ट्राची जनताच त्यांना संन्यास देईल”

Next
ठळक मुद्देमंत्रालय नागपूरच्या रेशीमबागेतील आदेशावरून दुसरेच लोक चालवत होते. पंकजा मुंडे, बावनकुळे हे फक्त चेहरे आहेतनिर्णय घेणारे लोक वेगळेच होते त्यामुळे पंकजा मुंडे, बावनकुळे आता काय बोलतात त्याला काही अर्थ नाहीओबीसी समाजाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली पण त्याच समाजाचा घात भाजपानं केला आहे

मुंबई - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजपा नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर केला आहे.  OBC Reservation: Congress Nana Patole Target BJP Devendra Fadnavis and Central Government

यासंदर्भात टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता दिल्यास चार महिन्यात आरक्षण आणतो अन्यथा राजकीय सन्यास घेईन असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत परंतु त्यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली  आहे. आता जनताच फडणवीसांना संन्यास देईल, देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव आहे. २०१४ च्या निवडणुकीआधीही त्यांनी धनगर समजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण पाच वर्षात त्यांना आरक्षण दिले नाही, धनगर समजाची त्यांनी घोर फसवणूक केली. मराठा समाजाचीही दिशाभूल केली आणि त्यांचे आरक्षण रद्द झाले आणि आता ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच झाले आहे असं त्यांनी सांगितले.  

तसेच भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षण संपुष्टात आणण्याची ही खेळी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वारंवार आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ठेवून आरक्षणविरोधी वातावरण निर्मिती केली. आरएसएसची विचारसणीच आरक्षणविरोधी आहे. त्यांना देशातील आरक्षण संपुष्टात आणायचे आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असणारी आकडेवारी ही केंद्राकडे आहे परंतु भाजपा नेते त्यासाठी राज्य सरकारकडे बोट करत आहेत. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याच विभागाने २०१७ साली अध्यादेश काढला होता त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. त्यांचे मंत्रालय नागपूरच्या रेशीमबागेतील आदेशावरून दुसरेच लोक चालवत होते. पंकजा मुंडे, बावनकुळे हे फक्त चेहरे आहेत, निर्णय घेणारे लोक वेगळेच होते त्यामुळे पंकजा मुंडे, बावनकुळे आता काय बोलतात त्याला काही अर्थ नाही असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला आहे.

दरम्यान, ओबीसी समाजाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली पण त्याच समाजाचा घात भाजपानं केला आहे. भाजपाच्या एका चुकीमुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेतील तब्बल ५५ हजार ओबीसी लोकप्रतिनिधींवर कुऱ्हाड कोसळली आहे. याप्रश्नी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या पाच जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.

Web Title: OBC Reservation: Congress Nana Patole Target BJP Devendra Fadnavis and Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.