Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:28 PM2021-08-03T15:28:30+5:302021-08-03T15:29:09+5:30

Gulabchand Kataria : काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते.

now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened | Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

Next

जयपूर : भाजपा नेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand kataria) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी खूप चर्चेत आहेत. गुलाबचंद कटारिया पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. या वक्तव्यावर काँग्रेसने (Congress) गोंधळ घातल्यानंतर गुलाबचंद कटारिया यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणावेळी सुद्धा गुलाबचंद कटारिया म्हणाले की, 'जर लालकृष्ण अडवाणींनी (Lal Krishan Advani) रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता. राम मंदिर बांधता आले नसते.' (now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened)

काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. रस्ते नाले बनतील, जर देश वाचला नाही तर देव तुम्हाला शाप देतील. या वक्तव्यावरून काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्यावर निशाणा साधला. गुलाबचंद कटारिया भाजपाला भगवान रामपेक्षा मोठे सांगत आहेत, असे म्हणत गुलाबचंद कटारिया यांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत आहे का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

दरम्यान, गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. गुलाबचंद कटारिया म्हणाले की, जर लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता आणि मंदिर बांधण्यात आले नसते. तसेच, भगवान रामावरून करण्यात आलेले विधान त्यांचे दुखणे होते की जर भाजपाने आंदोलन केले नसते तर रामाला आदर मिळाला नसता. यामागे प्रभू रामाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, यावर राजकीय चर्चा सुरूच आहेत, असे गुलाबचंद कटारिया म्हणाले.

'लस काय झाडाला लागल्यात का? हव्या तितक्या तोडून द्यायला!'
दोन आठवड्यांपूर्वी राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केलेल्या लसींच्या मागणीवर गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असे वक्तव्य गुलाबचंद कटारिया यांनी केले. यावरुन राजस्थानात मोठा वाद निर्माण झाला होता. 

Web Title: now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.