"प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:33 PM2021-02-02T14:33:14+5:302021-02-02T14:40:14+5:30

पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Not everyone can become Raj Thackeray says Bala Nandgaonkar | "प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

"प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

Next

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण-डोंबिवलीत खिंडार पडलं आहे. मनसेच्या राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत तर आज मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला सावरण्याचं आव्हान आता मनसेच्या नेत्यांसमोर आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

"निवडणुकीच्या काळात पक्षांतराच्या घटना होतच असतात. यात नवीन काहीच नाही. काही जणांनी पक्ष सोडला म्हणून पक्षाला फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते अशा ठिकाणी उभारी घेत असतात. सगळ्यांना राज ठाकरे होता येत नाही", असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

'...म्हणून मी भाजपात प्रवेश केला'; मनसेच्या नगरसेवकाने सांगितली अखेर मन की बात

मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर आज मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळा नांदगावकर यांच्यासोबच कल्याण-डोंबिवलीचे आमदार राजू पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.   

डोंबिवलीत शिवसेनेने पाडले मनसेला खिंडार, पालकमंत्री, खासदारांची राजकीय खेळी

"राजकारणात पक्षांतराच्या गोष्टी घडतच असतात. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षात असं होत असतं. यात नवीन काहीच नाही. मध्यंतरी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कितीतरी लोक सोडून दुसऱ्या पक्षात गेले, काँग्रेसचे लोकही सोडून गेले. पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर मी आताच भाष्य करण्यात पॉइंट नाही", असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

आमीष दाखवल्यानं हळबेंनी पक्ष सोडला- राजू पाटील
मनसेचे कल्याण-डोंबिवलीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मंदार हळबे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हळबे यांच्या पक्षांतराबाबत बोलताना कल्याण-डोंबिवलीचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हळबे यांच्यावर आरोप केला. 
"पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती असं ते म्हणतं आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिलं गेलं नाही, तर मग इतर दुसरं कारण काय असू शकतं?", असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला. 

स्वागतासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करु; अयोध्या दौऱ्याआधी विहिंपच्या नेत्यांचं राज ठाकरेंना आश्वासन

"एक-दोन कार्यकर्ते सोडून गेल्यानं पक्ष म्हणून काही फरक पडत नाही. निवडणूक आली की असे धक्के बसणारच. याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाही. आम्ही निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहोत. आमीष दाखवल्यानंच पक्षांतरं होतं आहेत", असंही ते पुढे म्हणाले. 

Web Title: Not everyone can become Raj Thackeray says Bala Nandgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.