No politics on Maratha reservation, we will cooperate with the government - Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर राजकारण नको, आम्ही सरकारला सहकार्य करू - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावर राजकारण नको, आम्ही सरकारला सहकार्य करू - देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

यावेळी मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये. मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :- 
 - मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये.  
- आमच्या सरकारच्या काळात अनेकांनी राजकारण केले, पण आम्ही राजकारण करणार नाही. 
- मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू.
- मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. 
- मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान अण्णासाहेब पाटील यांनी दिले. समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच त्यांना खरी आदरांजली. 
- शेतकरी विधेयकावर होणारे राजकारण चुकीचे आहे. 
- माथाडी चळवळीतील गुंडगिरी संपली पाहिजे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
-  सरकार मराठा समाजासोबत आहे. 
- मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. 
- मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार., न्यायालयीन लढाईसाठी  तज्ञ वकीलांची नियुक्ती 
- न्यायालयाचा आदर राखून मराठा समाजाच्या हितासाठी सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत.
- महाराष्ट्रावर काही डोमकावळे चोची मारत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्ही ( माथाडी) व शिवसैनिक समर्थ आहेत. 
- मुंबईतील मराठी माणसाचे स्थान टिकविण्यासाठी काम करू.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्ण करूया.एकत्र काम करण्याचे आवाहन. 
- माथाडी कामगारांची घरे व इतर प्रश्न सोडविणार.
- माथाडी चळवळीत गुंडगिरी मोडीत काढण्याचे ही दिले अश्वासन.

आणखी बातम्या..

'खोटं बोलणारे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवतायेत'; मोदींचा कृषी विधेयकांवरून विरोधकांवर हल्लाबोल

- गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका    

- रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध    

- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ     

Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

Web Title: No politics on Maratha reservation, we will cooperate with the government - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.