Nitesh Rane: "कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनामधून...’’नितेश राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:41 AM2021-08-26T11:41:33+5:302021-08-26T11:59:22+5:30

Nitesh Rane: नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक विधान, त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

Nilesh Rane: "Who is Rane? Those who say so have been showing for the last two days that we are waking up to Thackeray's salt from the Saamana" Nitesh Rane criticizes Sanjay Raut | Nitesh Rane: "कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनामधून...’’नितेश राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका 

Nitesh Rane: "कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनामधून...’’नितेश राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका 

Next

मुंबई - नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक विधान, त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. एकीकडे सामनामधून नारायण राणेंवर खास ठाकरी शैलीत टीका झाल्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना तितक्याच आक्रमक भाषेत बोचरे उत्तर दिले आहे. ("Who is Rane? Those who say so have been showing for the last two days that we are waking up to Thackeray's salt from the Saamana" Nitesh Rane criticizes Sanjay Raut)

नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरेंच्या मिठाला जागतो हे दाखवत आहे! स्व.माँ साहेबबद्दल यांनी काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे!, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला आहे. 

दरम्यान, एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे. दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनंतर आता केंद्रीय पातळीवरूनही नारायण राणेंना पाठिंबा मिळत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: Nilesh Rane: "Who is Rane? Those who say so have been showing for the last two days that we are waking up to Thackeray's salt from the Saamana" Nitesh Rane criticizes Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.