शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात नवे पर्व...विधानसभा  निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून कर्नाटकात बसवराज बाेम्मई यांच्याकडे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 06:03 IST

बसवराज हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बाेम्मई यांचे पुत्र आहेत. विद्यमान सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचे गृह खात्याची जबाबदारी हाेती.

ठळक मुद्देयेडीयुरप्पा यांना वय झाल्याचे कारण देऊन बाजुला सारण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर लिंगायत समाजातूनच राज्याला नवे नेतृत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला.विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर घेऊन बसवराज यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू हाेती. अखेर बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बाेम्मई यांच्या नावाची घाेषणा करण्यात आली. राज्यात वर्चस्व असलेल्या लिंगायत समाजातून आलेले बाेम्मई यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व देउन भाजपने सर्वमान्य चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. वडील आणि मुलगा दोघे मुख्यमंत्री असे कर्नाटकात दुसऱ्यांदा घडत आहे. एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी हेही कर्नाटकात मुख्यमंत्री होते.

बसवराज हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बाेम्मई यांचे पुत्र आहेत. विद्यमान सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचे गृह खात्याची जबाबदारी हाेती. कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या बहुतांशी लिंगायत समाजाकडे आहेत. येडीयुरप्पा यांना वय झाल्याचे कारण देऊन बाजुला सारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यांनाही नाराज करुन चालणार नव्हते. येडीयुरप्पा यांना हटविण्यास लिंगायत समाजातून बराच विराेध हाेता. समाजातील धर्मगुरुंनीदेखील भाजपला तसे सुचविले हाेते. त्यामुळे या समाजाची नाराजी ओढावून घेणे पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत परवडण्यासारखे नव्हते. अखेर लिंगायत समाजातूनच राज्याला नवे नेतृत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २०२३ची विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर घेऊन बसवराज यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे बसवराज हे देखील लिंगायत समाजाचे माेठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री एस. आर. बाेम्मई यांचाही वारसा त्यांच्याकडे आहे. बाेम्मई यांची झुंझार आणि लढवय्ये नेते म्हणून ओळख हाेती. 

बसवराज हे येडियुरप्पा यांच्या मर्जीतील नेते

बी. एस. येडीयुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली हाेती. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार हाेण्यापूर्वी त्यांनी मुलांना केंद्रात पद मिळण्याबाबत चर्चा केली हाेती. त्याबाबत आता पक्षनेतृत्त्वाकडून काय निर्णय घेण्यात येताे, याकडेही लक्ष लागले आहे. बसवराज हे येडीयुरप्पा यांच्या मर्जीतील नेते आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तरीही पडद्यामागून येडीयुरप्पा हेच सुत्रे हलिवणार का, असाही प्रश्न उपस्थित हाेताे. बसवराज हे स्वत:ची वेगळी छाप पाडणार की येडीयुरप्पा यांचीच सावली बनून राहणार का? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा