शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

धन्यवाद ताई! रोहित पवारांनी केलं पंकजा मुंडेंच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 15:30 IST

Rohit Pawar And Pankaja Munde : रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

मुंबई - भाजपातील नेतृत्वावर नाराज असलेल्या नेत्यांपैकी एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे वादळ शमत नाही तोच पंकजा मुंडे यांनी मंगळवारी शरद पवारांची स्तुती केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर याबाबत ट्विट केलं होतं. या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा." असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक

पंकजा मुंडे यांनी "शरद पवार यांना हॅट्स ऑफ. कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले...पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे" असं म्हटलं आहे. दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, हे त्यांनी यानिमित्ताने सांगितले. 

पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरू होती. या बैठकीत कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना 14 टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन 19 टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र