Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:09 PM2021-07-28T17:09:59+5:302021-07-28T17:11:26+5:30

Maharashtra Flood: आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

ncp rohit pawar says central govt should help maharashtra in flood situation | Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

Next

मुंबई: राज्यात विविध ठिकाणी झालेल्या प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकार मोठी घोषणा करू शकते, असे सांगितले जात आहे. त्यातच आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. (ncp rohit pawar says central govt should help maharashtra in flood situation) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्धव ठाकरेंपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेकांनी चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. यानंतर आता मदत आणि पूनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्राकडे मदतीचे आवाहन केले आहे. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी

अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेलं. तसंच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. राज्यपाल भतग सिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
 

Web Title: ncp rohit pawar says central govt should help maharashtra in flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app