शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

'आम्ही फक्त एचके पाटील यांच्या मताला महत्त्व देतो, नाना पटोलेंना शरद पवारांनी योग्य उत्तर दिलंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 18:18 IST

praful patel slams nana patole: 'एचके पाटील काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं.'

ठळक मुद्दे'शरद पवार महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात हे सरकार सुरू आहे.'

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 'नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू', असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनीही नाना पटोलेंवर निशाणा साधलाय.

एचके पाटील यांच्या बोलण्यात तथ्य असतंप्रफुल्ल पटेल यांनी नागपूरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या स्वबळाच्या भाषेवर प्रश्न करण्यात आला. यावर 'आम्ही फक्त एच.के. पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं', अशा शब्दात नानांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच, 'ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलेलं नाही. आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?' असा सवालही पटेलांनी केला.

'एचके पाटील काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देतो', असं म्हणत पटेलांनी नाना पटोलेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच, 'एचके पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर हे तिन्ही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. याचा अर्थ काय होतो, तुम्हाला माहीतच आहे,' असेही म्हणाले.

शरद पवारांनी सविस्तर उत्तर दिलंयप्रफुल पटेल पुढे म्हणाले की, 'शरद पवार महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात हे सरकार सुरू आहे. महाविकास आघाडीला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे आणि पुढेही राहील. नाना पटोले रोज बोलतात, त्याना रोज काय उत्तरं द्यावं ? त्याना सविस्तर उत्तर शरद पवारांनी दिलंय. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोलेAshok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार