शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

"ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:05 IST

Eknath Khadse :आपल्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावीन असं पक्षप्रवेशादरम्यान खडसे म्हणाले होते

ठळक मुद्देआपल्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावीन असं पक्षप्रवेशादरम्यान खडसे म्हणाले होतेराष्ट्रवादीच्या संवाद यात्रेदरम्यान खडसेंनी साधला संवाद

"माझ्या मागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन असं मी गंमतीनं म्हटलं होतं. तुमच्या मागे ईडी लागली तर असा प्रश्न जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना विचारला होता. तेव्हा माझ्यामागे ईडी लागल्यास सीडी लावणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता खरंच मागे ईडी लागली. पण आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ  खडसे यांनी केलं. गुरूवारी गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेचं आय़ोजन केलं होतं. रात्री उशीरा या सभेत बोलताना खडसे यांनी हे वक्तव्य केलं. "ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा जयंत पाटील यांनी तुमच्या मागे ईडी लागू शकते अशी शक्यता व्यक्त केली. त्यावर बोलताना मागे ईडी लागल्यास मी सीडी लावेन असं म्हटलं होतं. परंतु आता माझी प्रत्यक्षात ईडीची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचं काम करणार आहे," असं म्हणत खडसे यांनी भाजपला इशारा दिला. काय म्हणाले होते खडसे ?राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा गमच्या देऊन त्यांचे स्वागत केले.  "मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही," असं आपलं दु:ख व्यक्त करताना खडसे म्हणाले. "मला जयंत पाटील यांनी विचारले होते की, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात तर तुमच्या मागे ईडीची चौकशी लावली जाईल. तेव्हा काय कराल? मी म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन," असंही ते म्हणाले होते. 

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलGirish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव