शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 4:42 PM

ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh: त्रयस्थांनी बोललं तर समजू शकतो; पण आपल्यातल्या कोणी अडचणीत आणू नये; अजित पवारांचा राऊतांना सल्ला

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरुन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. याचे पडसाद थेट संसदेत उमटले आणि या प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षानं यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. (ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh)देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाण'पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?,' असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.एकच वाक्य बोलले, पण अगदी सूचक बोलले; शरद पवारांच्या भेटीबद्दल शहा म्हणाले...देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असं राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक' सदरात म्हटलं. त्यावर 'शरद पवारांनी अनेकदा अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्रिपद कोण होणार याचे निर्णयदेखील घेतले आहेत. याबद्दल महाविकास आघाडी वगळता एखाद्या त्रयस्थानं काही विधान केल्यास समजू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी सरकारचं कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये,' असा इशारावजा सल्ला अजित पवारांनी राऊत यांना दिला.'सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधानं करू नये. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू असताना कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीनं असं विधान केल्यास समजू शकतो. पण आपल्यातील कोणी अशा प्रकारे एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारsachin Vazeसचिन वाझे