एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर; नजरा शरद पवार - जितेंद्र आव्हाड बैठकीवर

By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 03:34 PM2020-10-23T15:34:43+5:302020-10-23T15:39:14+5:30

राष्ट्रवादी खडसेंना काय देणार याची जोरदार चर्चा

ncp chief sharad pawar helds meeting with jitendra awhad ahead of eknath khadses joining | एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर; नजरा शरद पवार - जितेंद्र आव्हाड बैठकीवर

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर; नजरा शरद पवार - जितेंद्र आव्हाड बैठकीवर

Next

मुंबई– एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता खडसेंच्या पुनर्वसनाचं आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे. एकनाथ खडसेंचा योग्य सन्मान राखण्यासाठी त्यांना मंत्रिपद देणं गरजेचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा देणं भाग पडणार आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा आहे.

एकनाथ खडसेंना कृषिमंत्री देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, परंतु शिवसेना कृषी खातं सोडण्यास उत्सुक नाही अशी माहिती मिळतेय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता खडसेंच्या पुनर्वसनाचं आव्हान असणार आहे. शिवसेना कृषी खातं सोडण्यास तयार नसल्यानं एकनाथ खडसेंना गृहनिर्माण खातं दिलं जाईल अशी चर्चा आहे. मात्र जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खातं सोडण्यास अनुकूल नाहीत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. बराच वेळ दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर हे नेते खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही?; राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाविकास आघाडीत धुसफूस

नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची चर्चा
सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तर नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष पद एकनाथ खडसेंना दिलं जाऊ शकतं, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. नियोजन मंडळाचं पद देऊन एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. 

...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?
१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

Web Title: ncp chief sharad pawar helds meeting with jitendra awhad ahead of eknath khadses joining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.