शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 18:56 IST

Ashish Shelar Warns Shivsena on Sampark Abhiyan : लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई : बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतींची खैरात, मग सामान्य मुंबईकरांना काय दिलेत? समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात मग पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टॅक्स वसुली करून पाकिटमारी का करताय?..असे मुंबईकरांचे बरेच हिशेब बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही घराघरात जावाच, असा टोला भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला आहे. (Ashish Shelar talks on Shivsena's Sampark Abhiyan in mumbai municipal Election.)

शिवसेनेने जाहीर केलेल्या संपर्क अभियानाबाबत बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे. कोरोनाला घाबरून "घराघरात" लपून का बसला होतात?मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होता? एकही रुपयाची मदत का दिलीत नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय? असे प्रश्न त्यांनी उपस्थितीत केले आहेत.

तसेच राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाबत ते म्हणाले की, लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे, अशी टीका केली.लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबईElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस