शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

“मुंबई असो की महाराष्ट्र, एकच ब्रँड; छत्रपती शिवाजी महाराज”; नितेश राणेंनी संजय राऊतांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 12:11 IST

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं.

ठळक मुद्देराणे बंधुनी शिवसेना नेते संजय राऊत यांना सुनावलं महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाहीछत्रपती शिवाजी महाराज हे एकच महाराष्ट्राचे ब्रँड - नितेश राणे

मुंबईमहाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले होते. यावरुन राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई असो की, महाराष्ट्र एकच ब्रँड, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. तर माजी खासदार निलेश राणेंनीही शिवसेनेवर टीका केली आहे.

आमदार नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड..छत्रपती शिवाजी महाराज असं एका वाक्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

निलेश राणेंनी ट्विट केले होते, त्यात म्हटलं होतं की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय?? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.

मनसेचीही शिवसेनेला चपराक

ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे.

तर महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक

राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?

CNG पंपाचे मालक होण्याची सुवर्णसंधी! सरकार १० हजार परवाने देणार; आजच करा अर्ज!

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतNilesh Raneनिलेश राणे Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई