शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
4
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
5
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
6
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
8
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
9
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
10
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
11
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
12
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
13
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
14
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
15
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
16
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
17
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
18
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
19
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
20
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...

मुंबईत केवळ शिवसेनेचा नगरसेवक असलेल्याच प्रभागात लसीकरण केंद्रांची सुरूवात; आशिष शेलार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:23 IST

Coronavirus Vaccine : ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची सुरूवात झाली आहे, शेलार यांचं वक्तव्य

ठळक मुद्देज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची सुरूवात झाली आहे, शेलार यांचं वक्तव्यशिवसेनेच्या दुजाभावामुळे नागरिक त्रस्त : शेलार

"मुंबई महानगरपालिकेनं लसीकरण केंद्रांचं उद्घाटन आणि त्यांचं काम सुरू करण्याच्या बाबतीत दुजाभाव केला आहे. एकतर्फी निर्णय त्यांनी घेतला आहे. २२७ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात सोमवारपर्यंत १०१ वॉर्डांमध्ये केंद्र सुरू करण्यात आली. त्या १०१ केंद्रांपैकी ९० टक्क्यांच्या वर ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची सुरूवात झाली आहे. त्या ठिकाणीच लसी उपलब्ध झाल्या आहेत," असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. "माझ्या मतदारसंघात सहा प्रभाग समिती वॉर्ड आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी लसी उपलब्ध झाल्या आणि लसीकरण केंद्रही सुरू झालं. पण भाजपचे तीन नगरसेवक असलेल्या आणि अपक्ष नगरसेवक असलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्रही सुरू झालं नव्हतं आणि लसीही आल्या नव्हत्या. लस केवळ शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेल्या भागातील लोकांनाच मिळेल का?," असा सवालही शेलार यांनी केला. या दुजाभावाची निर्मिती हे शिवसेनेचं कार्य आहे. यावर नागरिक त्रस्त असून त्याचं कारण केवळ शिवसेना असल्याचंही ते म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवाददम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आजच्या सामनाच्या अग्रलेखाला खाली डोकं वर पाय असं म्हणावं लागेल. स्तुत्य उपक्रमांना आमचं समर्थन आहेच. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे? मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?,” असं म्हणत शेलार यांनी जोरदार टीका केली. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे रोज कायदेशीररित्या केंद्रापुढे हात जोडत आहे. लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, १८ वर्षांवरील ४५ वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, या सर्व गोष्टी पुरवणाऱ्या केंद्रीय सरकारला मात्र दोष द्यायचा. त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत आहे, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रAshish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री