शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

"कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:16 PM

mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus: मनसेचा ठाकरे सरकारला सवाल; प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांना विरोध

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे. (mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus)राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...'महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?', असे प्रश्न देशपांडेंनी ट्विट करून विचारले आहेत. राज्य सरकारकडून जनतेला कोरोनाची नाहक भीती दाखवली जात असल्याचा आरोप मनसेकडून अनेकदा करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मास्क वापरणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोना नाही. मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर प्रेम आहे की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेनं राज्य सरकारवर केली आहे.  सरकार एवढे कडक निर्बंध लावत असेल, तर जनतेला काही सवलती देणार का? असाही प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, 'या' व्यक्तींना राज ठाकरेंचं आवाहनरुग्ण संख्या कमी झाल्यावर आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न अन्...कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या 'वरळी पॅटर्न'चं कौतुक करायचं आणि रुग्ण संख्या वाढल्यावर लोकांना बेजबाबदार म्हणायचं, अशा शब्दांत मनसेकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला. सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांना घाबरवायचं काम करत आहे. लोकांनी कामं करायची नाहीत का?, असा प्रश्न मनसेनं सरकारला विचारला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे