शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

'...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 13:05 IST

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रताप सरनाईकांवर निशाणा साधला आहे.

मुंबई: मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका या प्रकरणावरुन ठाण्यात शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद रंगला आहे. ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांनाही एक दिवस अशाचप्रकारे घरातून उचलून नेऊ या अविनाश जाधव असं विधान केले होते. अविनाश जाधव यांच्या या विधानावरुन तु कधी कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तर कधी भाजपाच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो, अशी टीका शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांच्या या टीकेवर आता मनसेने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रताप सरनाईकांवर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, हे कोण सांगतं जे आधी भाजपासोबत सत्तेत होते आणि आता राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्तेत आहे. आधी अविनाश भाऊ काय बोलले ते समजून घ्या. कशाला चिल्लर कामे करता, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. तसेच  मनसे दम आम्ही वेळेला सांगतोच आणि जगदंबे शपथ नाही दाखवला ना दम तर राज ठाकरे यांचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही लक्षात ठेवा, असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे.

हे कोण सांगते जे आधी सत्तेत भाजप बरोबर होते आणि आता सत्तेत राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत आहे ते लोक .आधी अविनाश भाऊ काय...

Posted by Rupali Patil Thombare on Sunday, 16 August 2020

तत्पूर्वी,  प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून अविनाश जाधव यांच्यावर टीका केली होती. प्रताप सरनाईक म्हणाले की, अविनाश जाधव तुझा काल व्हिडिओ पाहिला. तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर  मला तुझ्यावर खूप दया आली.  जेव्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतो तेव्हा मलाही वाटते की सर्वसामन्य जनतेच्या प्रश्नासाठी तू लढतो आहे. परंतु गेल्या वर्षाभरामध्ये बघितलं तर तु ज्या पद्धतीने जेव्हा सर्वांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला असताना जाणीवपूर्वक तू दहिहंडीचे आयोजन करतो. कधी कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तर कधी भाजपाच्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो. तसेच जाणीवपूर्वक तु ठाण्यातलं गेल्या अनेक वर्षापासून असलेलं वातावरण बिघडवण्याचं प्रयत्न करतो आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी अविनाश जाधव यांच्यावर केला होता.  

आयपीएस, आयईएस अधिकाऱ्यांना तु शिवीगाळ करतो योग्य नाही. लोकशाहीत आपल्याला काहीही बोलण्याचा स्वातंत्र्य दिलं म्हणून कश्याही प्रकारच्या  गैरवापर करायचा आणि  लोकांची सहानभूती मिळवायची हे योग्य नाही. शिवसेनेने ठाणे आणि पालघर जिल्हयासाठी जे काही केलं आहे ते इतिहास आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच तु बोलतोस की आम्ही देखील घरातून उचलून घेऊन जाऊ. घरात येऊन उचलून जायला आम्ही काही चिल्लर आहोत का असा सावल उपस्थित करत एका आमच्या साध्या कार्यकर्त्याला उचलून घेऊन जायची हिंमत दाखव असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी अविनाश जाधव यांना दिले आहे. 

शिवसेनेच्या नादाला लागायचा प्रयत्न कोणी केला तर सोडणार नाही!शिवसेना आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांचा कडक इशारा.....

Posted by शिवसेना 2.0 on Saturday, 15 August 2020

प्रताप सरनाईक यांच्या या टीकेनंतर अविनाश जाधव यांनी देखील व्हिडिओद्वारे आव्हान दिले आहे. अविनाश जाधव म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणं हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत, आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. परंतु माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.  तसेच मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा आदर करतात. शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय असं आवाहन देखील अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांना दिले आहे.

#हे_घ्या_उत्तर #AvinashJadhav #अविनाश_जाधव

Posted by मा. अविनाश जाधव अधिकृत on Saturday, 15 August 2020

मनसेचे नेतेही अविनाश जाधव यांच्या समर्थनासाठी मैदानात-

अविनाश जाधव यांच्या मागे सर्व महाराष्ट्र सैनिक खंभीरपणे उभे आहेत, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच अविनाश जाधव यांच्या एका विधानानंतर ठाण्यातील काही उंदीर बाहेर येत आहे, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा.

Posted by Sandeep Deshpande Adhikrut on Saturday, 15 August 2020

इतर महत्वाच्या बातम्या-

ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

मुंबई सांभाळता येत नाही अन् वार्ता देशाच्या; संजय राऊतांना निवडणूक लढवून दाखवायचं आव्हान

कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेAvinash Jadhavअविनाश जाधवpratap sarnaikप्रताप सरनाईक