कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:21 AM2020-08-17T11:21:00+5:302020-08-17T11:23:54+5:30

सुनील ईरावार यांना मनसेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

MNS has paid tributes to MNS activist Sunil Irawar from Nanded | कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

Next

मुंबई/ नांदेड: मनसेचेनांदेडमधील किनवटचे शहराध्यक्ष सुनील ईरावार रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुनील ईरावार यांनी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये जय महाराष्ट्र, राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही, असं म्हटलं होतं. 

सुनील ईरावार यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यातील मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील सुनील ईरावार यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थोडा संयम ठेवण्याची साद मनसेने घातली आहे. 

ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडे आहे. फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी ठाम आहे. सुनील ईरावार सारख्या उमद्या महाराष्ट्र सैनिकास गमावणं, हे हेलावून टाकणारं आहे, असं म्हणत सुनील ईरावार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण- 

राजकारणात जात आणि पैसा महत्त्वाचा असतो़ माझ्याकडे हे दोन्ही नाही. राजसाहेब मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून मनसेचे किनवट शहर प्रमुख सुनील ईरावार (२७, राग़ोकुंदा) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ईरावार यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ असे लिहिले आहे. या चिठ्ठीत ते म्हणतात, ‘आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि हे दोन्ही माझ्याजवळ नाही.

मुंबई सांभाळता येत नाही अन् वार्ता देशाच्या; संजय राऊतांना निवडणूक लढवून दाखवायचं आव्हान

आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा मला माहीत आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. माझ्यामुळे कोणाला त्रास देऊ नका, आई मला माफ कर, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे, राजसाहेब मला माफ करा.’ ईरावार हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. पक्षवाढीसाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला. आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: MNS has paid tributes to MNS activist Sunil Irawar from Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.