राष्ट्रवादीचा मनसे, भाजपाला एकाचवेळी धोबीपछाड, बड्या नेत्यांनी हाती बांधले घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 17:02 IST2020-09-09T17:01:48+5:302020-09-09T17:02:47+5:30

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला जाहीर प्रवेश

MNS & BJP's big leaders joins NCP Today | राष्ट्रवादीचा मनसे, भाजपाला एकाचवेळी धोबीपछाड, बड्या नेत्यांनी हाती बांधले घड्याळ

राष्ट्रवादीचा मनसे, भाजपाला एकाचवेळी धोबीपछाड, बड्या नेत्यांनी हाती बांधले घड्याळ

मुंबई  - मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते. 

मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश  

- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दगडू फेम प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे.

Web Title: MNS & BJP's big leaders joins NCP Today