भर विधानसभेत आमदार झोपले, जोरजोरात घोरू लागले; मुख्यमंत्री वळून वळून पाहत राहिले

By बाळकृष्ण परब | Published: March 2, 2021 09:53 AM2021-03-02T09:53:10+5:302021-03-02T09:54:20+5:30

The MLAs in the Assembly fell asleep : विधानसभेत होणाऱ्या वादळी चर्चा, गोंधळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणारी खडाजंगी हे बातमीमधील नेहमीचेच विषय असतात. (Politics News) मात्र कधीकधी काही भलत्याच कारणांसाठी विधिमंडळातील लोकप्रतिनिधी चर्चेचा विषय ठरतात.

The MLAs in the Jharkhand Assembly fell asleep, snoring loudly; The Chief Minister kept looking back | भर विधानसभेत आमदार झोपले, जोरजोरात घोरू लागले; मुख्यमंत्री वळून वळून पाहत राहिले

भर विधानसभेत आमदार झोपले, जोरजोरात घोरू लागले; मुख्यमंत्री वळून वळून पाहत राहिले

googlenewsNext

रांची - विधानसभेत होणाऱ्या वादळी चर्चा, गोंधळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणारी खडाजंगी हे बातमीमधील नेहमीचेच विषय असतात. (Politics News) मात्र कधीकधी काही भलत्याच कारणांसाठी विधिमंडळातील लोकप्रतिनिधी चर्चेचा विषय ठरतात. असाच काहीसा गमतीदार प्रकार नुकताच झारखंडमधील विधानसभेत (Jharkhand Assembly ) घडला आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या प्रकाराची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. (The MLAs in the Jharkhand Assembly fell asleep, snoring loudly; The Chief Minister kept looking back)

त्याचे झाले असे की, झारखंड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात राज्यपालांनी दिलेल्या अभिभाषणावर सोमवारी सभागृहात चर्चा सुरू होती. सर्वपक्षीय आमदार आपल्या क्रमानुसार अभिभाषणावर आपले मत मांडत होते. दरम्यान, अपक्ष आमदार सरयू राय हे विधानसभेत बोलण्यासाठी उभे राहिले असताना त्यांच्या भाषणादरम्यान, सभागृहातील एका बाजूने जोराजोरात आवाज येऊ लागला. हा आवाज घोरण्याचा होता. या आवाजामुळे भाषणात व्यत्यय येऊ लागला. सभागृहात उपस्थित सदस्य या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. पहिल्या बाकावर असलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेसुद्धा नेमका काय प्रकार सुरू आहे हे वळून वळून पाहू लागले. अखेर गाढ झोपलेल्या या आमदारांना उठवण्यात आले.  

दरम्यान, याच अधिवेशनात झारखंडमधील अनेक आमदार मास्क न घालताच सभागृहात आले होते. आमदारांची ही बेफिकीरी चर्चेचा विषय ठरली होती. याबाबत विचारणा केली असता या आमदार मंडळींकडून वेगवेगळ्या प्रकारे सारवासारव करण्यात आली. 

Web Title: The MLAs in the Jharkhand Assembly fell asleep, snoring loudly; The Chief Minister kept looking back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.