शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 11:30 IST

Mansukh Hiren Death Case: मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ट्विटवर भाष्य करणं राऊतांनी टाळलं; पत्रकारांच्या प्रश्नाला बगल

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह काल सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव संशयाच्या भोवऱ्याता सापडलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सचिन वाझेंवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. (shiv sena mp Sanjay Raut avoids question related with sachin waze)कोणी कोणी त्रास दिला?; मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोरसंदीप देशपांडे यांनी एका ट्विटमधून सचिन वाझेंचं शिवसेना कनेक्शन समोर आणत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलणं टाळलं. याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही, इतकंच राऊत यांनी म्हटलं. मनसुख हिरेन प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर येईल, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य असेल. निरपराध व्यक्तीच्या मृत्यूचं विरोधकांनी भांडवल करू नये, असं संजय राऊत म्हणाले.सर्व महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच कशा? सचिन वाझे भाजपपाठोपाठ मनसेच्याही रडारवरमनसुख हिरेन यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार याबद्दलचं सत्य चौकशीतून समोर येईल. अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या कारचे मालक आणि या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू होणं अतिशय धक्कादायक आहे. या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या पथकात अनेक नावाजलेले अधिकारी आहेत. ते सत्य शोधून काढतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे विधानसभेत पडसाद; विरोधक आक्रमककाय म्हणाले संदीप देशपांडे?मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. 'सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेMukesh Ambaniमुकेश अंबानीSanjay Rautसंजय राऊतSandeep Deshpandeसंदीप देशपांडे