mamta banerjee has become bangladeshi and working on direction of islamic terrorists said anand swaroop shukla | "ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर करतात काम; देशाला सर्वात मोठा धोका"

"ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर करतात काम; देशाला सर्वात मोठा धोका"

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. देशाला त्यांच्यापासून सर्वात मोठा धोका" असल्याचं म्हटलं आहे. 

आनंद स्वरुप शुक्ला यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "ममता बॅनर्जी या पूर्णत: बांगलादेशी झाल्या आहेत, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर सध्या काम करतात. देशाला त्यांच्यापासून सर्वात मोठा धोका आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागेल" असं शुक्ला यांनी म्हटलं आहे. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू; तृणमूलच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

ममता बॅनर्जी यांनी देखील भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बशीरहाटवरून लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार नुसरत जहाँ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत भाजपा हा कोरोनापेक्षा अधिका घातक विषाणू असल्याचं म्हटलं. भाजपा ही हिंदू आणि मुस्लीम यांदा दंगा घडवून आणतं. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, असंही त्या म्हणाल्या. 

"जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील"

नुसरत जहाँ या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीम बहुल भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कोरोना विषाणूशी केली. "तुम्ही सर्व डोळे उघडून ठेवा. भाजपासारखा धोकादायक विषाणू फिरत आहे. हा पक्ष धर्मांमध्ये भेदबाव आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये भांडणं लावतो. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील," असं नुसरत जहाँ म्हणाल्या. 

नुसरत जहाँ यांच्या वक्तव्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला. "पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावरून सर्वात वाईट राजकारण करण्यात येत आहे. सर्वप्रथम ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री सिद्धीकुला चौधरी यांनी लसीची वाहतूक करणारा ट्रक थांबवला. आता दुसरीकडे तृणमूलच्या नेत्या प्रचारादरम्यान भाजपाची तुलना कोरोनाशी करत आहेत. परंतु ममता बॅनर्जी का शांत आहेत?," असा सवाल अमित मालवीय यांनी केला. 

Read in English

Web Title: mamta banerjee has become bangladeshi and working on direction of islamic terrorists said anand swaroop shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.